1. राहायला नाही घर म्हणे लग्न कर 2. सासु क्लबमध्ये सुन पबमध्ये 3. खिशात नाही डोनेशन, घ्यायला चालला ऍडमिशन 4. मुलं करतात चॅनेल सर्फ़, आईबाप करतात होमवर्क 5. चुकली मुलं सायबरकॅफ़ेत 6. चुकल्या मुली ब्युटीपार्लरमध् ये 7. ज्या गावचे बार, त्याच गावचे हवालदार 8. नाजुक मानेला मोबाईलचा आधार 9. मनोरंजन नको रिंगटोन आवर 10. स्क्रिनपेक्षा एस एम एस मोठा 11. जागा लहान फ़र्निचर महान 12. उचलला मोबाईल लावला कानाला !!!!! 13. रिकाम्या पेपरला जाहिरातिंचा आधार!!!!! 14. काटकसर करुन जमवलं, इंकम टॅक्समध्ये गमावलं...!! 15. साधुसंत येती घरा, दारंखिडक्या बंद करा 16. ज्याची खावी पोळी, त्यालाच घालावी गोळी 17. एकमेका पुरवू कॉपी, अवघे होऊ उत्तीर्ण 18. लांबून देखणी, जवळ आल्यावर चकणी 19. चोर्या करुन थकला आणि शेवटी आमदार झाला 20. आपले पक्षांतर, दुसर्याचा फुटीरपणा 21. प्रयत्ने लाईनीत उभे राहता रॉकेलही मिळे 22. अन्यायाचा फास बरा, पण चौकशीचा त्रास आवरा 23. जया अंगी खोटेपण, तया मिळे मोठेपण 24. एल.एल.बी झालो अन भिकेला लागलो 25. सरकार जेवू घालीना, पदवी भिक मागू देईना 26. वशिल...