केंद व राज्य शासनाच्या सहकार्याने प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना राबविली जात आहे. केंद्र शासनाने 2014-15 या आर्थीक वर्षापासून खर्च मर्यादीत दरवाढ मंजूर केली आहे. त्यानुसार राज्य शासनानेही 7.5 टक्के दरवाढ केली आहे. त्यामध्ये सुधारित दरानुसार प्राथमिक शाळेतील प्रति लाभार्थीला 3 रू. 59 पैसे व उच्च प्राथमिकच्या प्रति लाभार्थीला 5 रू. 38 पैसे मिळणार आहेत. सुधारित दर 1 जुलै 2014 पासून लागू करण्यात येणार आहेत. राज्यामध्ये शालेय पोषण आहार ही योजना पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत आहे. यामध्ये पहिली ते पाचवीच्या प्राथमिक विद्यार्थ्यांना 450 उष्मांक व 12 ग्रॅम प्रथीनेयुक्त तसेच सहावी ते आठवीच्या उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी 700 उष्मांक व 20 ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार देण्यात येतो. या योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी 100 ग्रॅम व उच्च प्राथमिक वर्गासाठी 150 ग्रॅम तांदूळ पुरविण्यात येतो. तांदळापासून शालेय पोषण आहार तयार करण्यासाठी अन्न शिजविण्याच्या दरासाठी प्रतिदिन लाभार्थी आहार खर्च मर्यादा पहिली ते प...