माहिती तंत्रज्ञान अभ्यासक्रम इयत्ता ७ वी

उद्दीष्टे
  1. संगणकाच्या पिढ्यांची माहिती घेणे.
  2. माहिती तंत्रज्ञानातील संज्ञांची ओळख करुन घेणे.
  3. शब्दप्रक्रिया (Word Processing) व सादरीकरण (Presentation)  ही कौशल्ये हस्तगत करणे.
  4. तार्किक विचारप्रक्रियेचा विकास करणे.
  5. BASIC भाषेतील प्रोग्रॅमिंगची तत्वे आत्मसात करणे.
  6. माहिती तंत्रज्ञानाच्या वापराने शालेय विषयांचे अध्ययन-अध्यापन आनंददायी करणे.
अभ्यासक्रम (तात्विक)
  1. संगणकाच्या पिढ्या
    1. इलेक्ट्रॉनिक माध्यमातील बदल
    2. संगणकाच्या पिढ्या व कालावधी
    3. संगणकाच्या पिढ्यांची वैशिष्ट्ये
    4. तांत्रिक क्रांतीचे परिणाम व भविष्यवेध
  2. महत्वाच्या संकल्पनांची ओळख
    1. तात्पुरती स्मृती व कायम स्मृती
    2. मायक्रोप्रोसेसर
    3. अतयाधुनिक संपर्कयंत्रणा
  3. इंटरनेटची ओळख
    1. इंटरनेटची संकल्पना
    2. इंटरनेटसंबंधी संज्ञांची ओळख
    3. इंटरनेट कनेक्शन संबंधित बाबी
    4. इमेल
    5. काही उपयुक्त वेबसाईटस्
  4. माहिती तंत्रज्ञानाच्या कौशल्यांचा वापर
    1. एमएस वर्डची ओळख
    2. वर्डमधील मेनू
    3. सादरीकरणाची तंत्रे
    4. पॉवरपॉईंटची ओळख
    5. पॉवरपॉईंटमधील मेनू
  5. BASIC प्रोग्रॅमिंग
    1. अल्गोरिदम
    2. फ्लोचार्ट
    3. प्रोग्रॅमिंग
    4. बेसिक भाषेची ओळख
    5. बेसिकमधील मेनू
    6. बेसिक भाषेतील कमांडस्
    7. बेसिक भाषेतील स्टेटमेंटस् (कंट्रोल व लूपींग)
    8. सरावासाठी उदाहरणे
अभ्यासक्रम (प्रात्यक्षिक)
  1. संगणकाच्या पिढ्यांची तुलना करणारा तक्ता तयार करणे.
  2. माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित नोकरी व व्यवसायासंबंधित जाहिरातींचा संग्रह तयार करणे.
  3. संगणकाद्वारे इंटरनेटचे कनेक्शन मिळविणे / चालू करणे.
  4. इंटरनेटच्या सहाय्याने माहिती शोधणे.
  5. आवडत्या व उपयुक्त वेबसाईच्या पत्त्यांची नोंद ठेवणे.
  6. सुपरस्क्रिप्ट व सबस्क्रिप्ट सुविधेचा वापर करणे.
  7. सादरीकरणातील ऍ़निमेशन तंत्राचा वापर करुन ऐतिहासिक व्यक्तींबद्दलच्या माहितीचे सादरीकरण करणे.
  8. ध्वनीमुद्रण करुन स्लाइडचे सादरीकरण करणे.
  9. बेसिक प्रोग्रॅम्स.
With Thanks From - http://mahaedutechnet.org/CompEdu/index.htm

Popular posts from this blog

वाक्प्रचार व अर्थ

......॥जय शिवराय ॥.......