लोकमान्य टिळक
टोपणनाव:लोकमान्य टिळक जन्म: जुलै २३ , इ.स. १८५६ रत्नागिरी (टिळक आळी), रत्नागिरी जिल्हा , महाराष्ट्र , भारत मृत्यू: ऑगस्ट १ , इ.स. १९२० पुणे , महाराष्ट्र , भारत चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा संघटना: अखिल भारतीय काँग्रेस पत्रकारिता/ लेखन: केसरी मराठा पुरस्कार:लोकमान्यधर्म:हिंदूवडील:गंगाधर रामचंद्र टिळकआई:पार्वतीबाई टिळकपत्नी:तापीबाईअपत्ये:श्रीधर बळवंत टिळक [१] तळटिपा:"स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच " बाळ गंगाधर टिळक ( जुलै २३ , इ.स. १८५६ - ऑगस्ट १ , इ.स. १९२० ) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य राजकीय पुढारी, भारताच्या स्वातंत्र्यलढयाचे आद्य प्रवर्तक, भारतीय असंतोषाचे जनक, गणितज्ञ, खगोलतज्ञ, राजकीय तत्त्वज्ञ, पत्रकार, संपादक, लेखक, वक्ते आणि स्वातंत्र्यसेनानी होते. लोकमान्य या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो. बालपण टिळकांचा जन्म २३ जुलै इ.स. १८५६ मध्ये रत्नागिरीमधील मधल्या आळीत, एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला. टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे...