देशासाठी पर्वा न केली तनाची , आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची ॥धृ॥ जिद्दीने लढला तो शिवराणा, वै-याला दाखवला खंबीरपणा , बोटे तोडली त्याने शायिस्तेखानाची . आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची ॥१॥ पहार वाकवी अफजलखान , पैजेला उचलून दरबारी पान . बाजी लावलीया जीवानं , प्रतापगडच्या रानाची . आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची ॥२॥ आधी लग्न कोंढाण्याच, मगच माझ्या रायबाचं . लढता लढता अमर झाला त्या तानासारख्या सिंहाची आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची ॥३॥ आशिर्वाद त्या माऊलीचा , पुत्र शोभे जिजाउचा , स्वराज्य रक्षण्या पुन्हा घेउनी ये तलवार शिवाई देवीची आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची ॥४॥ देशासाठी पर्वा न केली तनाची , आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची ॥धृ॥ . . . :- संजय वसंत जगताप जि.प.शाळा अहिरवडे ता.मावळ जि पुणे ९७६२१८१७०६