शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतनाचे प्रकार व माहिती
1. शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतनाचे प्रकार कोणते ? एकंदरीत निवृत्तीवेतनाचे आठ प्रकार आहेत. नियत वयोमान निवृत्तीवेतन, पूर्णसेवा निवृत्तीवेतन, रुग्णता निवृत्तीवेतन, भरपाई निवृत्तीवेतन, जखम किंवा इजा निवृत्तीवेतन, अनुकंपा निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन, असाधारण कुटुंब निवृत्तीवेतन असे हे प्रकार आहेत. नियत वयोमानानुसार म्हणजे वयाची 58 वर्ष पुर्ण झाल्यावर व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वयाची 60 वर्ष पुर्ण झाल्यावर कर्मचारी निवृत्त होतो. स्वेच्छा निवृत्ती, रूग्णता आणि भरपाई हेही निवृत्तीचे प्रकार आहेत. अकार्यक्षमतेमुळे देण्यात येणारी निवृत्ती म्हणजे अनुकंपा निवृत्ती होय. निवृत्ती वेतन घेणारा जेव्हा मरण पावतो तेव्हा त्याच्या कुटूंबियांना मिळते ते कुटूंब निवृत्ती वेतन. एखादा सरकारी कर्मचारी हरवल्यास त्याच्या कुटूंबियांना त्रास होवू नये म्हणून असाधारण कुटूंब निवृत्ती दिल्या जाते. 2. निवृत्ती वेतन कोणाला देय आहे ? सेवानिवृत्ती वेतनासाठी कमीत कमी 10 वर्ष कालावधी हिशेबात घेतला जातो. आता 10 वर्ष सेवा झाल्यानंतर शेवटच्या वेतनावर पुर्ण निवृत्ती वेतन दिले जाते. ज्या कर्मचाऱ्यांची...