बालमंच 1


सत्यम्‌ शिवम्‌ सुंदरा


नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा
सत्यम्‌ शिवम्‌ सुंदरा ।।धृ ।।

शब्दरूप शक्‍ती दे
भावरूप भक्‍ती दे
प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा ।।1।।

विद्याधन दे अाम्हांस
एक छंद, एक ध्यास
नाव नेई पैलतीरी दयासागरा ।।2।।

हो‍ऊ आम्ही नीतिमंत
कलागुणी बुद्धिमंत
कीर्तिचा कळस जाई उंच अंबरा ।।3।।

Popular posts from this blog

वाक्प्रचार व अर्थ

......॥जय शिवराय ॥.......

माहिती तंत्रज्ञान अभ्यासक्रम इयत्ता ७ वी