आकारिक मूल्यमापन आकारिक मूल्यमापन :
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनान्तर्गत वर्षभरात प्रत्येक सत्रात आकारिक व् सकलित मूल्यमापन करावयाचे आहे।शासन निर्णयात आकारिक व् संकलित मुल्यामापानाचा भारांश निश्चीत करुन दिलेला आहे . आकारिक साधन तंत्रांना योग्य भारांश देण्यासाठी आणि मूल्यमापनाची प्रक्रिया वस्तुनिष्ठ स्वरुपात पार पाडण्यासाठी शिक्षकांनी आपल्या विषयांच्या अध्यायन- अध्यापनाचे व मुल्यामापनाचे नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी मार्गदर्शक मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत .
पूर्वतयारी :
१ शिक्षकांनी संबंधित विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम . पाठ्यपुस्तके , हस्तपुस्तिका , / मार्गदर्शिका यांचा अभ्यास करावा .
२ पाठ/ घटकनिहाय अध्ययन- अनुभव देण्यासाठी आणि मूल्यमापन करण्यासाठी कोणकोणती साधन तंत्रे वापरायची याची निवड करावी
३ सर्वसाधारणपणे खालीलप्रमाणे साधन तंत्रांचे नियोजन करता येईल
भारांश निश्चिती :
१ . दैनंदिन निरीक्षण हे साधन सर्व विषयासाठी वापरणे अनिवार्य आहे; पण या साधनास गुण द्यायचे नाहीत त्यामुळी वेगळा भारांश देण्याची गरज नाही .
२. निवडलेल्या उर्वरित साधनांसाठी संबंधित विषयाची उद्दिष्टे लक्षात घेऊन भारांश निश्चित करावा निवडलेल्या सर्व साधनांचा एकत्रित भारांश आकारिक मूल्यमापनाच्या एकूण भारांशा एवढा असावा
३. विद्यार्थ्यास कोणत्याही एका विषयाचा प्रकल्प निवडण्याचे स्वातंत्र्य आहे . विद्यार्त्याने ज्या विषयाचा प्रकल्प निवडला नसेल त्यांच्यासाठी प्रकाल्पा ऐवजी अन्य साधन निवडावे व प्रकल्पाचा भारांश त्या साधनास द्यावा .
४. विषयनिहाय निवदेली साधन तंत्रे व त्यांचा भारांश वर्गातील सर्व विद्यार्थ्यांसाठी सारखाच आसेल (विशेष गरजा असणारी मुले व मुद्दा क्र . ३ च्या परिस्थितीत लवचिकता द्यावी )
५. एकाच वर्गासाठी निवडलेल्या सारख्याच साधन तंत्रांचा वेगवेगळ्या विषयांसाठी भारांश वेगवेगळा असू शकतो . (विषयाची उद्दिष्टे व पाठ्यान्शाचे स्वरूप यानुसार भारांश बदलू शकतो )