शिष्यवृत्ती
शिष्यवृत्ती परीक्षेची माहिती
शिष्यवृत्ती परीक्षा एकूण ३०० गुणांची असते. त्यामध्ये प्रत्येकी १०० गुणांचे भाषा, बुध्दिमत्ता चाचणी व गणित असे ३ पेपर्स असतात. प्रत्येक पेपर १ तासाचा असतो. तीनही पेपर एकाच दिवशी घेतले जातात. (शकयतो दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुस-या वा तिस-या रविवारी परीक्षा घेतली जाते.
इ. ४ थी (मराठी माध्यम) साठी शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरुप
शै. वर्ष २००९ पासून शिष्यवृत्ती परीक्षेच्या स्वरुपात बदल करण्यात आले आहेत.
- पेपर १ - भाषा
- मराठी विषयासाठी ७० गुण तर
- इंग्रजी विषयासाठी ३० गुण आहेत.
- पेपर २ - बुध्दिमत्ता चाचणी व सामान्य विज्ञान
- बुध्दिमत्ता चाचणी विषयासाठी ७० गुण तर
- सामान्य विज्ञान विषयासाठी ३० गुण आहेत.
- पेपर ३ - गणित व समाजशास्त्रे :
- गणित विषयासाठी ७० गुण तर
- समाजशास्त्रे (इतिहास, भूगोल व ना. शास्त्र) विषयासाठी ३० गुण आहेत.
काठीन्य पातळी -
प्रत्येक पेपरमधील प्रश्नांची काठीन्यपातळी खालीलप्रमाणे असेल.
प्रत्येक पेपरमधील प्रश्नांची काठीन्यपातळी खालीलप्रमाणे असेल.
- कठीण प्रश्न - १० टक्के
- मध्यम प्रश्न - २० टक्के
- सोपे प्रश्न - ७० टक्के
इ. ७ वी (मराठी माध्यम) साठी शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरुप
- पेपर १ - भाषा :
- मराठी विषयासाठी ८० गुण तर
- इंग्रजी विषयासाठी २० गुण आहेत.
- पेपर २ - बुध्दिमत्ता चाचणी व सामान्य विज्ञान
- बुध्दिमत्ता चाचणी विषयासाठी ७० गुण तर
- सामान्य विज्ञान विषयासाठी ३० गुण आहेत.
- पेपर ३ - गणित व समाजशास्त्रे :
- गणित विषयासाठी ७० गुण तर
- समाजशास्त्रे (इतिहास, भूगोल व ना. शास्त्र) विषयासाठी ३० गुण आहेत.
काठीन्य पातळी -
प्रत्येक पेपरमधील प्रश्नांची काठीन्यपातळी खालीलप्रमाणे असेल.
प्रत्येक पेपरमधील प्रश्नांची काठीन्यपातळी खालीलप्रमाणे असेल.
- कठीण प्रश्न - ३० टक्के
- मध्यम प्रश्न - ३० टक्के
- सोपे प्रश्न - ४० टक्के
प्रत्येक पेपरमध्ये ३० किंवा अधिक गुण व तीनही पेपर्समध्ये मिळून किमान १४० गुण ही या परीक्षांच्या उत्तीर्णतेची अट आहे.
जिल्हावार शिष्यवृत्तींच्या उपलब्ध संचांनुसार पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाते.