छान छान गोष्टी
- Get link
- X
- Other Apps
By
.
-
परीस
एक माणूस परीस शोधायला निघाला.... त्यासाठी रस्त्यात जो दगड येईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा असा त्याचा दिनक्रम सुरू झाला दिवस गेले... महिने लोटले... वर्षे सरली.... पण त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही ....दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि मग तो फेकून द्यायचा....शेवटी तो माणूस म्हातारा झाला.... आणि ज्या क्षणि तो आपले शेवटचे श्वास मोजत होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या गळ्यातील साखळीकडे गेले... ती साखळी सोन्याची झाली होती..... दगडघ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे लक्षच गेले नाही....
प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी परीस येत असतो...कधी आई- वडिलांच्या रूपाने, तर कधी भाऊ-बहीनीच्या नात्याने...तर कधी मित्राच्या मैत्रिणीच्या नात्याने ..... कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपल्याला भेटत असतो... आणि आपल्यातल्या लोखंडाचे सोने करीत असतो...... आपण जे काही असतो किवा बनतो त्यात त्यांचा बराच हातभार असतो .......
- Get link
- X
- Other Apps