@ "खिचडी शिक्षणाची "@


@ "खिचडी शिक्षणाची "@
सरकार बस झालं आता
खिचडी शिजवायचं ..!
गोरगरिबाच्या पोराना आम्ही
सांगा कधी शिकवायचं ..?
तुमच्या साचलेल्या अनुदानास
फुटतील बासमतीचे कोंब ,
टिचभर पोषणासाठी गावभर
इथं मारावी लागतीय बोंब ,
गुणवत्तेचं हे घोंगडं आणिक
किती दिवस भिजवायचं ..!
गोरगरिबाच्या पोराना आम्ही
सांगा कधी शिकवायचं ..?
आणखी किती दिस चालणार
वाढत्या योजनांचा जुगार ,
कधीतरी होऊ द्या वेळेत
शिक्षकाचा थकलेला पगार ..!
एकाच गुरुजीनं ं सांगा
किती ठिकाणी उगवायचं ....
सरकार बस झालं आता
खिचडी शिजवायचं ..!
आज गुरुजी शिकवणार म्हणुन
पोरंही वाट बघती बिचारी ...
किराणाचा हिशोब .. व्यवस्थेनं
केलाय ' आचार्याचा आचारी '
कागदावरचं सरकारी अभियान
कसं समाजासमोर टिकवायचं ?
गोरगरिबाच्या पोराना आम्ही
सांगा कधी शिकवायचं ..?
गुणवत्तेच्या पोषणास आतातरी
द्या शिक्षणाच्या खिचडीतून वेळ
शासनाचा घरगडी बनवून त्याच्या
आयुष्याचा नका मांडू खेळ
'सारे शिकुया पुढे जाऊया ' पिक
सगळ्यांनी मिळून पिकवायचं
सरकार बस झालं आता
खिचडी शिजवायचं ..!
(शिक्षक कवी - संजय जगताप )
(९७६२१८१७०६ , महाराष्ट्र साहित्य परिषद)

Popular posts from this blog

वाक्प्रचार व अर्थ

......॥जय शिवराय ॥.......

माहिती तंत्रज्ञान अभ्यासक्रम इयत्ता ७ वी