पटसंख्या वाढविण्याचे उपाय♦

पटसंख्या वाढविण्याचे उपाय
✏ आपल्या शाळेचा शै.दजॉ उंचावण्याचा प्रयत्न करा. 
✏ शाळेतील उपक्रमांची अमलबजानी करण्यासाठी पालकांचा सहभाग वाढवावा.
✏ शाळेत साजरे होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला आलटून-पालटून प्रत्येक पालकाला बोलवा.त्यांचा योग्य तो सन्मान करा.
✏ इतर शाळेत जाणारे दाखले व मुले रोखा.
✏ इतर शाळांपेक्षा आपला शै.दजॉ निश्चितच चांगला आहे ;हे पालकाला पटवून सांगा.
✏ क्रिडास्पर्धा ,सांस्कृतिक कार्यक्रम व आनंद मेळावे तसेच विविध कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करा .
✏ मुलांच्या अंगी असलेले कलागुण ओळखून त्यास चालना देऊन प्रसिद्धी मिळवा.
✏ विद्यार्थी लाभाच्या योजना प्रत्येका पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा.
✏ जि.प.शाळा आपली व खाजगी शाळा वैयक्तिक मालकीची आहे अशी पालकांची मानसीकता तयार करा.
✏ गावातील सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होऊन मने जिंका.
✏ नकारात्मक दृष्टीकोन ठेवूच नका. आलेल्या अपयशातूनच यशाचा मार्ग शोधा.
✏ गावातील अंगनवाडी ताईला सोबत घेऊन पूर्व प्राथमिक वर्ग शाळेला जोडा.
✏ अंगनवाडी नियमीत भरत नसेल तर पालकांच्या मदतीने नियमीत भरवा.त्यात आपलाच फायदा आहे.
✏ नामांकीत खाजगी शाळेत निवडक अ-१ श्रेणीची मुले असतात. त्याच्या गुणवत्तेत शाळा नव्हे पालकांचा सिंहाचा वाटा असतो हे समजावून सांगा.
✏ आपल्या शाळेत रिक्त पद राहणार नाही याची काळजी घ्या .
✏ शासन दरबारी पालकांमार्फत योग्य मागण्यांकरीता नियमित पाठपुरावा करा .
✏ मातृ प्रबोधन वर्गाचे आयोजन करा. १००%वैयक्तिक स्वच्छता व योग्य बदल दिसेल.
✏ गावातील सेवाभावी संस्थाची मदत व सहकार्य मिळवा.
✏ गावातील विविध मंडळ व युवक-युवतींचे सहकार्य मिळवा.
✏अपमान पचवा व इतरांचा सन्मान करा. आपलाच योग्य तो सन्मान होईल.

Popular posts from this blog

वाक्प्रचार व अर्थ

......॥जय शिवराय ॥.......

माहिती तंत्रज्ञान अभ्यासक्रम इयत्ता ७ वी