माहिती तंत्रज्ञान अभ्यासक्रम इयत्ता ६ वी
उद्दीष्टे
- माहितीच्या अत्याधुनिक स्रोतांशी ओळख करुन घेणे.
- माहितीच्या स्वरुपानुसार उपलब्ध अत्याधुनिक तंत्रांचा वापर करणे.
- संगणकाद्वारे दृष्टी व हस्तकौशल्यांमधील समन्वयाचे दृढीकरण करणे.
- प्रोग्रॅमिंगचा पाया तयार करणे.
- माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने शालेय विषयांचे अध्ययन-अध्यापन आनंददायी करणे.
अभ्यासक्रम (तात्विक)
- संगणकाचा इतिहास
- विकासाचे टप्पे
- बहुविद माध्यम साधनांचा अभ्यास
- मल्टिमिडीयाचे फायदे
- मल्टिमिडीयासाठी लागणारी साधने
- एंटरटेनमेंट/मल्टिमिडीया मेनू
- स्कॅनर
- क्षेत्रभेट
- द्विमान संख्याप्रणाली
- संख्यापध्दती
- द्विमान संख्यापध्दती
- डेसीमल नंबरचे बायनरी नंबरमध्ये रुपांतर
- बिट्स आणि बाईटस्
- आस्की (ASCII) कोडस्
- संगणकीय जाळे
- संगणकीय जाळे व त्याचे फायदे
- नेटवर्कसाठी लागणारी साधने
- नेटवर्कचे प्रकार
- सर्व्हर व क्लायंट
- नेटवर्कचे तोटे
- टोपोलॉजी
- लोगोची ओळख
- लोगो
- लोगो स्क्रीन
- लोगो आज्ञा
- लोगोमधील मेनू
- कमांडर विंडो
- नमुन्यादाखल उदाहरणे
अभ्यासक्रम (प्रात्यक्षिक)
- संगणक विकासाच्या टप्प्यांचे कालावधी व इतर तपशील दाखविणारा तक्ता संगणकावर तयार करणे.
- सीडीचा वापर करुन गाणी ऐकणे.
- ध्वनीमुद्रणाचा संगणकीय प्रोग्रॅम वापरुन ध्वनीमुद्रण करणे.
- स्कॅनरचा वापर करुन संगणकात चित्र किंवा फोटो साठविणे.
- दशमान संख्येचे द्विमान संख्येत रुपांतर करणे.
- द्विमान संख्येचे दशमान संख्येत रुपांतर करणे.
- आस्की कोडचा वापर करुन BOY व GIRL हे शब्द लिहिणे.
- संगणकात वापरल्या जाणाऱ्या स्टोअरेज डिव्हाईसेसचा तक्ता तयार करणे.
- स्टार टोपोलॉजीचा वापर करुन लॅन (LAN) कार्यपध्दतीची प्रतिकृती तयार करणे.
- लोगोच्या सहाय्याने 30 आकाराचा पंचकोन तयार करणे.
- लोगोमध्ये 220 + 150 हे उदाहरण सोडवून त्याचे उत्तर दाखविणे.
- लोगोमधील Repeat कमांडचा वापर करणे.
With Thanks From - http://mahaedutechnet.org/CompEdu/index.htm