सर्व शिक्षा अभियानाची चौकट

सर्व शिक्षा अभियानाची चौकट

शालेय यंत्रणेच्या सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याचा प्रयास करणे, हा सर्व शिक्षा अभियानाचा हेतू आहे. 
हे अभियान म्हणजे देशभरातल्या दर्जेदार पायाभूत शिक्षणाच्या गरजेचा प्रतिसाद आहे. या मोहिमेच्या माध्यमातून सामाजिक दायित्वाचे भान राखत सर्व बालकांमधील मानवी क्षमतांच्या विकासाची दर्जेदार संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
 

अंमलबजावणीसाठी चौकट का? (मार्गदर्शक तत्वे का नाहीत?) -
  • राज्यांना सर्वंकष चौकटीमध्ये संदर्भाधारित मार्गदर्शक तत्वे तयार करण्याची परवानगी देणे.
  • स्थानिक विशिष्टतेला प्रतिसाद देण्यास देशातील राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशातील जिल्ह्यांना प्रोत्साहन देणे.
  • विस्तृत राष्ट्रीय धोरणाच्या अटीवर आधारीत स्थानिक गरजांना प्रोत्साहन देणे.
  • विस्तृत राष्ट्रीय अटींचा स्वीकार करून नियोजन अधिक वास्तववादी राखणे.
  • विविध जिल्हे आणि राज्ये आपापल्या संदर्भानुसार कालबध्दरित्या सार्वत्रिकीकरणाचे ध्येय साध्य करतील, हे अपेक्षित असतानाही ही उद्दिष्टे राष्ट्रीय स्तरावर जाहीर करण्यात आली.
  • भिन्न धोरणांच्या माध्यमातून शाळेबाहेर असणा-या बालकांना मुख्य प्रवाहात आणणे आणि 6 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना 8 वर्षे शालेय शिक्षण उपलब्ध करून देणे, यावर मुख्य भर आहे.
  • सर्व सामाजिक आणि लिंगाधारित भेदावर आधारित विषमतेची दरी भरून काढणे आणि सर्व विद्यार्थ्यांना शाळेत टिकवण्याचा निकराचा प्रयत्न करणे.
  • बालके आणि पालकांना शालेय पध्दती उपयुक्त, वेधक तसेच नैसर्गिक आणि सामाजिक वातावरणाशी सुसंगात वाटावी, या दृष्टीने शिक्षण यंत्रणा सुसंबध्द बनवली पाहिजे.

सर्व शिक्षा अभियानः एक चौकट आणि कार्य
सर्व शिक्षा अभियानाचे दोन पैलू आहेत.: 
  • I ) या व्दारे प्राथमिक शिक्षण योजनांच्या अंमलबजावणीसाठी विस्तृत केंद्राभिमुख चौकट उपलब्ध होते.
  • II) प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण साध्य करण्याच्या दृष्टीने अत्यावश्यक क्षेत्रांच्या मजबुतीकरणासाठी अर्थसंकल्पीय तरतूद असणारा हा कार्यक्रम आहे. सर्व शिक्षा अभियानाचा एक भाग म्हणून राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांमध्ये प्राथमिक शिक्षणातील गुंतवणूक केली जाईल, तसेच येत्या काही वर्षांत या योजना, सर्व शिक्षा अभियानात विलीन होतील. एक कार्यक्रम म्हणून हे अभियान UEE साठी अतिरिक्त स्रोताची तरतूद असल्याचे सिध्द होते.

 (PDF Size: 16.3MB. PDF पाहण्यासाठी येथे टिचकी मारा.)http://mpsp.maharashtra.gov.in/SITE/Pdf/SSA_Framework.pdf

Popular posts from this blog

वाक्प्रचार व अर्थ

......॥जय शिवराय ॥.......

माहिती तंत्रज्ञान अभ्यासक्रम इयत्ता ७ वी