प्रार्थना - जय शारदे

जय शारदे वागीश्वरी
विधिकन्यके विद्याधरी ||

ज्योत्‍स्‍नेपरी कांती तुझी,
मुख रम्य शारद चंद्रमा
उजळे तुझ्या हास्यांतुनी
चारी युगांची पौर्णिमा
तुझिया कृपेचे चांदणे
नित्‌ वर्षु दे अमुच्या शिरी ||

जय शारदे वागीश्वरी
विधिकन्यके विद्याधरी ||

वीणेवरी फिरता तुझी
चतुरा कलामय अंगुली
संगीत जन्मा ये नवे,
जडता मतिची भंगली
उन्मेष कल्पतरूवरी
बहरून आल्या मंजिरी ||

जय शारदे वागीश्वरी
विधिकन्यके विद्याधरी ||

Popular posts from this blog

वाक्प्रचार व अर्थ

......॥जय शिवराय ॥.......

माहिती तंत्रज्ञान अभ्यासक्रम इयत्ता ७ वी