शिक्षण महाचर्चा
🌺 महापर्व महाचर्चेचे 🌺
♦What's app group - शिक्षक मिञमंडळ
♦दि. 24 /06 /2015
वार - बुधवार
♦विषय - विद्यार्थ्यामधे वाचन लेखन कौशल्यांचा विकास कसा घडुन आणावा? यासाठी कोणते नाविन्यपुर्ण उपक्रम राबविता येईल?
♦चर्चा वृतांत :
♦१) विद्यार्थी अप्रगत राहण्याची कारणे कोणती आहेत?
👉 1) विद्यार्थ्याची अनियमितता
2) पालकाचे उदर निर्वाह साठी स्थलातर मुलाला एकटे पणा जाणवतो
👉अर्थिक परिस्थिती, सामाजिक व परिवारातील अनुभव, भाषेचा अडसर, व्यंगाचे निदान न होणे.
👉 पालक उदासीनता व विद्यार्थी मानसिकता, घरी अभ्यास करत नाही, सततचे आजारीपण व अतिलाड
♦२) अप्रगत मुलांमध्ये वाचन लेखन कौशल्यांचा विकास कसा घडुन आणावा?
👉 प्रथम विद्यार्थी शाळेत टिकून राहण्यासाठी त्याच्या मनातील शाळेची भीती दूर करावी लागेल त्यासाठी शिक्षकाला विद्यार्थ्यांचा मित्र बनावे लागेल जिव्हाळा निर्माण करावा लागेल
👉 जास्तीत जास्त सरावावर भर, शैक्षणिक साहित्याचा वापर वाढविणे गरजेचे
👉 काही मुले शाळेत येतात पण वर्गात न बसता भांवडासोबत दुसऱ्या वर्गात रमतात
आपल्याला अशी मुले अगोदर प्रवाहात आणण्यासाठी शक्य तो ई लर्निग तास उपयोगी
👉 To make groups of student.and gives extra exercises. Teacher gives personally attention to the such a student.
👉 मुळाक्षरे शिकवण्यासाठी प्रथम आकर्षक साहित्याचा उपयोग घ्यावा लागेल की जेने करुण स्वत: विद्यार्थी हाताळतील आनन्द मनोरंजनात्मक पध्द्दतीने शिकतिल
👉 गटागटानै बसवुन चुरस निर्माण करावी
👉 भाषिक खेळ घ्यावेत.. खेळाविषयी मुलांना आकर्षण असतेच
👉जी मुले वाचत नाहीत त्यांचा एक वेगळा गट करावा किंवा वर्ग करून त्यांना मार्गदर्शन करावा.
👉 एक मात्र सर्वांनी हे लक्षात घ्यावे की मुळाक्षरे शिकवतान्ना आधीचि शिकवलेली अक्षरेही नविन अक्षर शिकवतांना सरावात घ्यावी अन्यथा होते काय की पुढे पाठ मागे सपाट
👉 मुलांना बोलण्याची आणि ऐकण्याची मुबलक संधी वर्गात मिळायला हवी. वाचन-शिक्षणाचा पाया त्यातून घातला जातो.
♦३) तिसरा मुद्दा - श्रवण विकसित करण्यासाठी काय करता येईल? कोणते उपक्रम राबविता येईल?
👉 चांगल्या आवाजातील ध्वनिफीती ऐकवणे
👉 वाचन शिकण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावरच मुलाला श्रवणाचेही भरपूर अनुभव मिळायला हवेत. ऐकलेल्या आवाजांमधला सूक्ष्म फरक ओळखण्याची क्षमता त्यातून विकसित होते. उदाहरणार्थ – चाक-चाके, पाट-पाठ, काठ-खाठ, वास-पास यातील नेमका फरक ऐकण्याची क्षमता.
👉 गाणी कृतीसह व ppt बनवले पाहिजे
👉 यमक जुळणारी वाक्ये असणार्या गोष्टी मुलांना ऐकायला मिळायला हव्यात. उदाहरणार्थ – एक होता मासा. त्याला दिसला ससा. तो सशाला म्हणाला, “तू आज इकडे कसा?”
👉 मुलाना गोष्टी खूप आवडतात नंतर प्रश्न विचारावे
👉 ज्यांचा शेवट सारखा ऐकू येतो. असे शब्द मुलांना शोधायला सांगावे. उदा- पाणी-गाणी-राणी-नाणी; किंवा पान-मान-छान-लहान-कान.
♦४) चौथा मुद्दा - संभाषण कौशल्य विकसित कसे करता येईल? त्या साठी तुमच्या अभिनव कल्पना कोणत्या?
👉 मुलांना बोलके करणे गरजेचे, त्यामुळे ते बोलतात...
👉 One picture is equal to thousands of words.. चिञ वर्णन खुप महत्वपूर्ण
👉 बोललेला शब्द आणि लिखित शब्द यात अंतर असते. मूल जर प्रमाणभाषा बोलत नसेल, एखादी बोली बोलत असेल, तर हे अंतर आणखी वाढते, आणि वाचन शिकणे आणखी अवघड होते. अशा परिस्थितीत मुलानेच सांगितलेला मजकूर लिपिबद्ध करण्याने या अडचणीचे प्रमाण कमी होते कारण बोललेल्याचा लिहिलेल्याशी संबंध जोडला जातो. आपणच बोलते ते कागदावर उतरलेले मुलांना दिसते.
👉 🌷संभाषण कौशल्य विकसित करण्यासाठी
नाट्यगीत, नाट्टीकरण यावर भर द्यावा
क्षेत्र भेटीद्वारे औपचारिक संभाषण विकसित करण्यात हातभार लागेल
जसे बॅक, पोष्ट आॅफिस
👉संभाषण कौशल्य साठी विविध सण वार तुम्ही कसे साजरे करता ते सांगण्यास सांगणे
तुम्हाला कोणत्या ghosti आवडतात ते सांगन्यास सांगने
कविता म्हणणं
तुम्ही t v काय बघता ते सांगने
👉 नंदी या शब्दातील न या अनुस्वार लिहताना वाचताना विसरला तर नदी हा वेगळा शब्द तयार होतो.मूळ शब्दापेक्षा शब्दाचा अर्थ वेगळा होतो.
👉 विविध व्यवसाय करणाऱ्या चा नकला करुन घेणे
👉 🌷मुलाना गोष्टी सांगण्याची संधी
द्यावी
🌷बालसभा घ्यावा
वेळेवर विषय देऊन बोलण्यास सांगावे
♦५) पाचवा मुद्दा - वाचन कौशल्य कसे विकसित करता येईल? अप्रगत किंवा नविन शिकणार्या मुलांमध्ये वाचन कौशल्य कसे विकसित करता येईल?
👉 वाचनपूर्वतयारीच्या टप्प्यावरच्या कृती साधारणपणे या प्रकारे कठीण होत जायला हव्यात :
-चित्र-जोड्या
-आकार-जोड्या
-अक्षराशी साम्य असलेल्या आकारांच्या जोड्या
-शब्दजोड्या
👉 शिक्षकाचे स्वतःचे वाचन शुध्द असणे गरजेचे
👉 मुलांची घरची भाषा कोणती याचा पण विचार करावा
👉 वाक्यांमधील शब्द पत्त्यांवर लिहून त्यांची वाक्य बनवायला मुलांना प्रोत्साहन द्यायल हवे. उदाहरणार्थ –
बाबा काल आले.
मामा आज आले.
शब्दपत्त्यांमधून वाक्ये बनवणे हे वाचन-लेखन दोन्ही क्षमतांच्या विकासासाठी महत्त्वाचे.
👉 बोली भाषेकडून प्रमाण भाषेकडे नेण्याचे नियोजन असायला हवे.
👉 आशय जरी क्रमिक पुस्तकांमधला असता, तरी त्यातील शब्द गाभ्याशी मानून, मुलांनी ते स्वतःच्या वाक्यांत वापरावे यासाठी शिक्षकाने प्रोत्साहन द्यायला हवे. शब्दांशी खेळत वेगवेगळी वाक्ये मुलांनी बनवली आणि वाचली तर वाचन शिकण्याच्या प्रक्रियेला मदत होते.
👉 वाचन दोषांचा अभ्यास शिक्षकाला करायला हवा.
👉 वाचन दोष सुधारण्यासाठी ध्वनीमुद्रणाचा वापर करता येईल
👉 कपाटात हजार पुस्तक असली तरी काय कामाचे? वाचन कोपरा मध्ये २५ भारी
👉 वाचताना अर्थपूर्ण वाचन गरजेचे आहेच वेगवेगळ्या शब्दावर जोर दिला तर अर्थही बदलतो .
वाचनकोपऱ्याचा खुप उपयोग होतो
👉 बोली भाषेतून अध्यापन करावे तसेच प्रमाण भाषेतील पर्यायी शब्द त्याच वेळेस लक्षात आणून द्यावेत। प्रमाण भाषा व् बोलीभाषेतिल शब्द जोड्या लावणे खेळ घेता येईल
👉 एक शब्द देऊन त्याला अनुसरून इतर शब्द.
उदा. आकाश- निळे, चांदण्या, ढग, स्वच्छ,इ. संभाषण कौशल्य वाढवण्यासाठी.
👉 Reading should be interesting or the way of introducing reading.if it is traditional boring method pupils became harassed by it
👉 त्याने बोललेले आपण फळ्यावर लिहावे.. सहज च वाचन शिकते मुल
👉 वाचन घेत असताना जर शब्दात एक लिंकता असेल तर वाचनात मुलांना रुची येते
👉 इंग्लिश साठी 👉बाजारातुन विकत घेतलेले सामनाचे बॉक्सेस जमा करुण शाळेत भिंतीवर चिटकावन जसे colgate. fair & lovely निच्चित शब्द वाढ होइल
👉 विचारपूर्वक निवडलेली, मांडलेली, रंगीत चित्रे असलेली पुस्तके शाळेत असायला हवीत. ती कुलूपबंद नसायला हवीत
👉 शब्दाने सुरुवात करुन घेऊन पाहिलं.
पण पालक घरी अक्षरेच घेतात.
आणि तसाच आग्रह करतात.
पण शब्द आणि मग अक्षर ही पद्धतच योग्य
👉 वाचनासा ठी भाषिक खेळाची आपल्याला खुप मदत होऊ शकते
👉 शब्दाने सुरुवात करुन घेऊन पाहिलं.
पण पालक घरी अक्षरेच घेतात.
आणि तसाच आग्रह करतात.
पण शब्द आणि मग अक्षर ही पद्धतच योग्य
♦६) लेखन कौशल्याची पायाभरणी कमकुवत का राहते?
👉 लेखन कौशल्यात विद्यार्थी अनेक चुका करतात. त्यासाठी येणाऱ्या अडचणींचा आपण शोध घेतला पाहिजे असे मला वाटते सरजी.
विद्यार्थी जिवनात सुंदर हस्ताक्षराचे महत्त्व अनन्य साधारण आहे. परिक्षा व विद्यार्थी याचा अखंड संबंध सुरू असतो. परिक्षेत सुयश प्राप्त करण्यासाठी सुंदर हस्ताक्षर प्रभावी माध्यम आहे.
वि.ना अभ्यासात आवड निर्माण करण्यासाठी वि.ची आकलन क्षमता विकसीत करण्यासाठी लेखन हे अविभाज्य घटक आहे.
👉 श्रवण आणि वाचन कौशल्ये विकसित नसल्यामुळे.. लेखन करण्याचा कंटाळा निर्माण होतो
👉 वि.अक्षरा-अक्षरात व शब्दा मंध्ये तूटकपणा ठेवत नाही.
काही मुले अक्षर वळणदार काढतात पण -हस्व दिर्घ वेलांटी उच्चार 1ली वेलांटी की 2 री वेलांटी हे त्याच्या लक्षातच येत नाहि.
वाक्य लिहीतांना अक्षरांत व शब्दात सारखा आकार दिसत नाही.
♦७) लेखन कौशल्याचा विकास घडुन आणण्यासाठी कोणते उपक्रम राबविता येईल?
👉 सुंदर हस्ताक्षरातूनही वि.चे लेखन कौशल्य विकसित करता येते.
यातीलच त्याच्या चूका अडचणीत कारणे व त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. सुंदर हस्ताक्षरातील या चूचूकडे लक्ष दिले नाही तर त्या वाढतच जाऊन मराठी भाषेचे गांभिर्य लक्षात येणार नाही.
त्यासाठी सर्व मुळाक्षरांचा सराव करून मग शब्द वाक्य सुविचार म्हणी छोटे छोटे बोधवाक्य क्रमिक पाठय़पुस्तकातील परिच्छेद फळ्यावर लिहून वि.कडून लेखन करू शकतो.
👉 अक्षरांचा आकार काढायला मुलांना त्रास वाटतो. फलकलेखन नियमित केल्यामुळे विद्यार्थी आवडीने लेखन करतात.द्वितीय सत्रात १ ली ची मुले व्यवस्थित लेखन करू लागतात.
👉 लेखनात अचूकता आणण्यासाठी उच्चारण करुन लिहिण्यास सांगावे
👉 मुलांना सहज प्रवृत्ति ने लिहायला सांगावे
👉 दररोज मोजका सराव करुन घेणे जेणेकरुन चुका कमी होतील
👉 शिक्षकांनी आदर्श लेखन करून दाखवावे
👉 मुलांना स्वतः विषयी लिहायला सांगावे
👉 चुका आणि शिका या उक्तिप्रमाने मार्गक्रमन असावे
👉 एकाच वहिवर जर नियमित सराव घेतला तर लेखनासोबत वाचन व हस्ताक्षर सुध्दा सुधारते
👉 शुद्ध लेखन तपासले जात नाही.. ही वास्तविकता आहे... मुलांच्या बारीक बारीक चुकाकडे आवर्जुन लक्ष देणे आवश्यक..
👉 त्यासाठी ग्रुप करावेत.. गटप्रमुखाचे आपण स्वतः चेक करावे नंतर गटातील इतरांचे तपासण्यास सांगावे. वेळ वाचतो.
👉 लेखन कौशल्याचा विकास करण्यासाठी कित्ता वही
👉 सुविचार तक्ते कींवा चार्ट तयार करायला सांगावे
नंतर उत्तम नमुने वर्गात चिटकवून प्रोत्साहन देणे
👉 श्रुतलेखनाचा खूप फायदा होतो
♦७) शेवटचा मुद्दा - अप्रगत मुलांमध्ये सुधारणा करण्यासाठी è learning चा वापर कसा करावा?
👉 è learning चा वापर अप्रगत मुलांचे श्रवण, संभाषण, वाचन, लेखन या साठी ...
वि.ना संगणकाची ओळख करून देणे.
संगणकाच्या मदतीने अवघड वाटणारा विषयांश समजून देणे.
वि.ना संगणक चालू करणे
प्रोग्राम सुरू करणे.
संगणक किबोर्ड हाताळणे अभ्यास क्रमाचा भाग श्रवण करून चित्र बघून आशय वाचून ज्ञान समृध्द बनवू शकतो.
👉 ई लर्निग १००%प्रभावी
छोटे व्हिडीओ दाखवले व वाचन
चित्र ,शब्द व उच्चार पक्का होतो
मी हेच वापरून अध्यापन
करतो ,परिणाम चांगला
वर्षात एकटाच असताना ई लर्निग मुळेच कंट्रोल व टिचींग
👉 यामुळे कठीण संकल्पना मुलांच्या डोक्यात उतरून अध्ययन अध्यापन प्रक्रिया मनोरंजक व आनंददायी होऊ शकते.
कमी श्रमात जास्त फळ मिळेल.
100 % उद्दिष्टे साध्य होण्यास मदतच होईल.
👉 ई लर्निग मुळे मुलं + - 1 1 2 1 2 3 ....अंकज्ञान चढता उतरता क्रम इ.गणिती क्रिया पर्यावरणाची माहिती कि बोर्डाच्या मदतीने संगणकावर नाव लिहणे अक्षरांचा आकार वळण .सि.डी. टाकून अभ्यास करू शकतो व त्यामुळे नाविन्य येईल.
👉 मुलांचे संभाषण, वाचन याचे व्हीडीओ बनवावे व मुलांना दाखवावे.. आनंदी आनंद गडे.. मुलांना खुप आनंद होतो... सहज शिकतील.. Be tech savvy!
महाचर्चेचे महापर्व या चर्चा सञात सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला.. विचारांची.. उपक्रमांची देवाणघेवाण झाली.. सर्वांचे आभार