सरल डेटाबेस प्रणाली
🎯 "सरल" 🎯
✳ SCHOOL ✳
👉सरल डेटाबेस प्रणाली बाबत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व सरलचे काम करूणा-यासाठी सुचना -
सरल या महाराष्ट्र शासनाच्या वेब साईट वर विद्यार्थ्यांची माहिती भरण्यासाठी अगोदर शाळेच्या मुख्याध्यापकांनी तीन स्टेप मध्ये माहिती भरणे आवश्यक आहे .
१. शाळेतील असलेले वर्ग व तुकड्या तयार करणे .
२. शाळेतील शिक्षक नोंदवून त्यांचे पासवर्ड तयार करणे.
३. तयार केलेल्या तुकड्यांना वर्ग शिक्षक नेमणे .
या तीन पायऱ्या नुसार कार्यवाही केल्यानंतर वर्गशिक्षक विद्यार्थ्यांची माहिती भरू शकतात. वरील माहिती कशी भरायची याविषयी step by step माहिती आपणास देऊ इच्छितो.
१. सर्व प्रथम आपल्या कम्प्युटर ला इंटरनेट जोडणी आवश्यक आहे . इंटरनेट जोडणी असलेल्या संगणकावर fire fox किंवा google chrome हे ब्राउजर असणे आवश्यक आहे.
२. आपल्या संगणकावर इंटरनेट ब्राउजर मध्ये www.education.maharashtra.gov.in हा वेब अड्रेस टाका व गो या बटनावर क्लिक करा किंवा इंटर बटन दाबा.
३. वरील क्रिया पूर्ण झाल्यावर आपणासमोर खालील प्रमाणे महाराष्ट्र शासनाची वेब साईट ओपन होईल. यामध्ये school, staff, student असे तीन Tab दिसतील या तीन मधील student Tab वर क्लिक करा.
४. Student Tab वर क्लिक केल्यावर आपणासमोर खालील प्रमाणे window ओपन होईल. खालील फोटोत दाखविल्या प्रमाणे Login here या कोपऱ्यात सुरवातीला drop down लिस्ट मध्ये head master असे निवडा त्यानंतर username मध्ये आपल्या शाळेचा udise code टाका.Password मध्ये password टाका. Captcha box मध्ये वरील दिसणारे अंक टाका आणि login वर क्लिक करा.
५. login झाल्यावर नवीन पासवर्ड तयार करा अशी विंडो ओपन होईल. नवीन password तयार करा. नवीन पासवर्ड आपल्या मुख्याध्यापकांच्या मोबाईल वर sms द्वारे जाईल.
६.नवीन sms तयार झाल्यावर पुन्हा लोगिन करा. (head master)
७. लॉगीन झाल्यावर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल . त्यामध्ये school details वर क्लिक करून शाळेची माहिती भरा. त्यामध्ये मुख्याध्यापकांचे नाव , शाळेचा फोन नंबर, मुख्याध्यापक जन्म तारीख, मुख्याध्यापक यांचा मोबाईल नंबर भरा.
८. आता Master Tab वर तुमच्या माउस चा pointer न्या लगेच खाली Division व Assign class teacher अश्या दोन tab दिसतील त्यापैकी Division tab वर क्लिक करा .आपणास खालील प्रमाणे विंडो दिसेल.
वरील माहिती भरताना अगोदर standard मध्ये इयत्ता निवडा stream म्हणजे शाखा १ ते १० पर्यंत गरज नाही. Division मध्ये तुकडी टाकायची आहे त्यासाठी अंक वापरायचे आहेत A साठी १ , B साठी २ असे . medium मध्ये तुकडीचे माध्यम निवडा. strength मध्ये विद्यार्थी संख्या टाका. आणि शेवटी add या बटनावर क्लिक करा. आपल्या शाळेची तुकडी समाविष्ट होईल अशाच प्रकारे सर्व वर्गांच्या तुकड्या समाविष्ट करा.
९. तुकड्या व वर्ग समाविष्ट झाल्यावर Master या बटनावर माउस नेऊन त्यामध्ये Create Teacher User या बटनावर क्लिक करा. यामध्ये आपण शिक्षक रजिस्टर करू शकतो. आपणासमोर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल.
वरील विंडो मध्ये शिक्षकाचे नाव , शालार्थ id असेल तर , Designation मध्ये जर तो वर्ग शिक्षक असेल तर class teacher व नसेल तर assistant teacher असे टाकावे. शिक्षकाचा मोबाईल नंबर टाका कारण त्या नंबर वर युजर नेम व पासवर्ड जातो . शेवटी Register या बटनावर क्लिक करा. सर्व शिक्षकांची माहिती भरून झाल्यावर master या बटनावर माउस नेऊन Assign Class Teacher या बटनावर क्लिक करा.
१०. Assign Class Teacher या बटनावर क्लिक केल्यावर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल कि ज्यामध्ये आपण तुकड्यांसाठी वर्ग५ शिक्षक देऊ शकतो असे केले नाही तर शिक्षकांनी login केल्यावर ते माहिती भरू शकत नाही.
यामध्ये वर्ग व तुकडी निवडून शिक्षक निवडा व assign बटनावर क्लिक करा.
आपल्या शाळेतील सर्व वर्गशिक्षकांना वर्ग जोडून दिल्यानंतर मुख्याध्यापकाचा Student Portal वरील ऑनलाईन रोल सध्यापुरता पूर्ण होईल.
आता आपल्या शिक्षकांनी त्यांच्या वर्गाची माहिती कशी भरावी हे आपल्यालाच त्यांना समजावून सांगावे लागेल. कारण प्रशिक्षण मुख्याध्यापकांचे झाले आहे वर्ग शिक्षकांचे नाही.
शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांची माहिती भरायला सुरूवात करण्यापूर्वी आपल्या खात्यात प्रवेश कसा करावा ? माहिती कशी भरावी ? याबाबत सविस्तर माहिती.
वर्गशिकांना त्यांच्या मोबाईलवर एक system generated SMS मिळालेला असेल. त्यात त्या शिक्षकाचा User ID आणि Password असेल. शिक्षकाला https://education.maharashtra.gov.in या वेबसाईटच्या HOME PAGE वर SCHOOL, STAFF आणि STUDENT अशा तीन प्रकारच्या टॅब दिसतील. त्यापैकी STUDENT या टॅबवर क्लिक केल्यास

अशी विंडो दिसेल. Select Role वरून Class Teacher हा पर्याय निवडावा. आपल्या मोबाईलवर प्राप्त User ID व Password टाकून प्रथम लॉगीन करावे. लगेच पासवर्ड बदलून घेण्यासाठी एक विंडो येईल. त्यातील सूचनांनुसार Password बदलून घ्यावा व परत नवीन Password ने लॉगीन करावे.
यातील Student Details मधील New Student Entry हा पर्याव निवडावा.
वरील चित्रात दिसत आहेत त्याप्रमाणे रकाने भरून पूर्ण करावेत. यातील माहिती भरणे सोपे जावे यासाठी विद्यार्थ्यांची माहिती एका कागदावर आपल्यासमोर असावी यासाठी Student Data Collection चा PDF फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याचा फॉर्म अगोदरच भरून ठेवल्यास आपला वेळ वाचेल.
विद्यार्थ्याची Regular, Address & Birth Details
माहिती भरून झाल्यावर खालीलप्रमाणे Family & Bank Details इ. माहिती भरावी.
अशाप्रकारे आपल्या वर्गातील पटावर असलेल्या सर्व मुलांची माहिती वर्गशिक्षक या नात्याने आपल्याला भरावी लागेल.
महत्त्वाची सूचना आपला पासवर्ड गोपनीय ठेवा. ऑनलाईन काम करत असताना आपल्याला काम थांबवायचे असेल तर अशा वेळेस Logout करायला विसरू नका.
💥 STUDENTS💥
🔴 Student माहिती भरताना Headmaster roll मधुन -
1. Divisions
2. Create Teacher user आणी
3. Assigen Teacher User
ही प्रक्रिया पुर्ण केल्यानंतर Headmaster Roll logout करावा.
🔴 नंतर विद्यार्थी माहिती ही ClassTeacher Roll मधुन भरावी. HM Roll मधुन विद्यार्थी माहिती भरू नका. HM हे ClassTeacher ने भरलेली माहिती अचूक आहे की नाही याची पडताळणी करतील.
🔴 Student Login मध्ये HM roll साठी User ID हा आपल्या शाळेचा Udise no. असेल. व Password हा defult password प्रशिक्षणात सांगितल्यानुसार असेल.
🔴 Classteacher roll साठी User id व पासवर्ड classteacher च्या mobile वर SMS द्वारे येईल. नंतर Password Change करून घ्यावा.
🔴 जर एखाद्या classteacher la User ID व Password मिळाला नसेल तर HM roll मधुन Maintenance मध्ये जावे. नंतर View Teacher user वर जावुन ज्या Classteacher la SMS आला नाही त्याच्या समोरील View वर क्लिक करून सर्व माहिती Mobile No. बरोबर असल्याची खात्री करून Reset password करा . लगेच SMS येईल.
🔴 महत्वाचे - विद्यार्थी माहिती ClassTeacher Roll मधुनच भरा. मुख्याध्यापकांकडे वर्ग असला तर त्यांनी सुद्धा त्यांच्या वर्गातील विद्यार्थी माहिती ही classteacher roll मधुनच भरावी.
💻 STAFF 💻
''सरल'staff portal वरशिक्षक माहिती भरतानाच्या पायर्या
1 ) प्रथम teaching staff मध्ये map from shalarth and udiseया वर क्लिक करावे.एखादा शिक्षक select करून map बटनावर क्लिक करावे.
2.त्यानंतर data updated by head master यावर जावून चुकलेली माहीती दुरूस्त करून save करावी.हीच कृती non teaching staff बाबत करावी.
3 त्यानंतर teaching staff मधून teaching details वर क्लिक करा new record वर क्लिक करून staff select करून submit वर क्लिक करावे.
4 पुढील माहिती भरावी.
1 वैयक्तिक माहिती, सुरूवातीची दिनांक, इत्यादी प्रकारची माहिती भरावी मात्र आज रोजी पर्यत सेवा पुस्तक भरलेले असणे आवश्यक आहे.
शिक्षकांनी सर्व शैक्षणिक कागदपत्रे
व व्यावसायिक कागदपत्रे scan करून ठेवावीत.
1mb पेक्षा कमी साईज असावी.
जातीचे प्रमाणपत्र,
वैधता प्रमाणपत्र,
अपंगाचे प्रमाणपत्र (असतील तर).
बेसिक पे,
पे बँड, गटविमा, जिपीएफ,
नाॅमिनी,
आधार,
निवडणूक ओळखपत्र इत्यादी.
👉सरल ची माहिती भरताना
✏शाळा माहिती
✏स्टाफ माहिती
✏विद्यार्थी माहिती
👉या तिन्ही माहिती भरण्यासाठी वेगवेगळ्या लिंक ओपन कराव्या लागतात त्यात जास्त वेळ जात असल्यामुळे या तिन्ही लिंक खालील ठिकाणी देतोय🙏
शाळा Login
https://education.maharashtra.gov.in/users/login/4
शिक्षक Login
https://edustaff.maharashtra.gov.in/Teachers/teaching
विद्यार्थी Login
https://rte25admission.maharashtra.gov.in/stud_db/users/login
🙏😊🙏💻😊🙏🙏
From:-
www.shikshansanjivani.com