उपक्रम - "चला कविता करूया"

"चला कविता करूया"

उपक्रमासाठी एकूण मुलांमधून कल्पनाशक्ती चांगली असणारी मुले निवडावी.

* गद्य व पद्य यातील फरक काय हे मुलांना विचारून कवितेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून द्यावे .

*मुलांना आजपर्यंत आवडलेल्या काही कविता म्हणावयास सांगाव्या.आपण काही निवडक कविता ऐकवाव्यात.

* या कवितांमधले यमकदर्शक शब्द कोणते ते विचारावे.ज्यामुळे कविता लयीत वाटते.

* सर्वांना काही मराठी यमक दर्शक शब्द  लिहिण्यास सांगावे.उदा.वारा,गारा,पारा,चारा,इ.

*लिहिलेल्या यमकदर्शक शब्दांना गुंफून कवितेच्या फक्त ४ ओळी कल्पनेसह लिहिण्यास सांगावे.व मार्गदर्शन करावे

*सुंदर ओळी व कल्पना मांडणारांचे कौतुक करावे व लिहिलेल्या ओळीना चाल लावण्यास सांगावे.व त्यासाठी मदत करावी.

*आता मुलांचे प्रत्येकी ४-४ चे गट करावेत.
*प्रत्येक गटाला वेगळा विषय द्यावा.
उदा.आई,पाऊस,निसर्ग,भारत देश,आपले गाव,इ.

* त्यावर आधारीत कवितेच्या ओळी शक्य होईल तितक्या लिहीण्यास सांगाव्या व या ओळी चालीत बसवण्यास सांगावे.

* सुंदर कविता व चाल असणाऱ्या गटाचे अभिनंदन करावे.

*गृहपाठ - प्रत्येक विद्यार्थ्याला आपला आवडीचा विषय घेऊन त्यावर आधारीत कविता लिहून आणण्यास सांगावी व तपासून परिपाठात कवितेचे सादरीकरण घ्यावे.

*कविता लेखनासाठी स्वतंत्र वही करण्यास सांगून त्यात स्वलिखित सुंदर कवितांचा संग्रह करावा.

*झालाना मग एक छान काव्यसंग्रह..! आता त्याला एक छान नाव द्या.

*शाळेतील अशा बालकांचा सामुहीक किंवा वैयक्तिक काव्यसंग्रह स्नेहसंमेलनात किंवा इतर मोठ्या कार्यक्रमात प्रकाशित करा.

* शाळेच्या हस्तलिखित व जीवन शिक्षण, किशोर, अशा शैक्षणिक मासिकां  मध्येही या कवितांना स्थान देता येईल.

* हा उपक्रम आम्ही आमच्या शाळेत राबवून 'उषःकाल','अंकुर','पालवी' अशा हस्तलिखितांची निर्मिती व प्रकाशन केले आहे.

* अशा अनेक छोट्या कवींचे शाळेत किंवा केंद्रशाळेत एक कवीसंमेलन भरवा.

*चला तर मग कविता करूया आणि नवोदित कवी होऊया.

*************************************

अधिक माहितीसाठी संपर्क -
श्री.संजय वसंत जगताप
(शिक्षक कवी व साहित्यिक,महाराष्ट्र साहित्य परिषद ) जि.प.प्राथमिक शाळा अहिरवडे ता.मावळ जि.पुणे.मो.९७६२१८१७०६ वेबसाईट www.shikshansanjivani.com

Popular posts from this blog

वाक्प्रचार व अर्थ

......॥जय शिवराय ॥.......

माहिती तंत्रज्ञान अभ्यासक्रम इयत्ता ७ वी