चला तंत्रस्नेही होवूया..! महत्वाच्या तंत्र शैक्षणिक टिप्स
चला तंत्रस्नेही होवूया..!
महत्वाच्या तंत्र शैक्षणिक टिप्स
स्क्रीन शॉट कसा घ्यावा
स्क्रीन शॉट म्हणजे स्क्रीनचा घेतलेला फोटो. तुम्हाला येतो असा फोटो काढता?
खरंतर स्क्रीन शॉट अथवा स्क्रीनचा फोटो घेण्यासाठी कुठल्याही कॅमेर्याची गरज पडत नाही. कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅबलेट किंवा स्मार्ट फोनमध्येच काही युक्त्या वापरून तुमच्या डिव्हाईसचा स्क्रीन शॉट घेता येऊ शकतो.
‘स्क्रीन शॉट’ घ्यायचाच कशाला?
१) टेक्नोसॅव्ही जगतामध्ये स्क्रीन शॉटला फार महत्त्व आहे; कारण स्क्रीन शॉटचा वापर करून टेक्नोसॅव्ही मंडळी मोठमोठे प्रॉब्लेम्स सोडवितात. समजा, तुम्ही कॉम्प्युटरवर काम करीत आहात आणि तुमच्या सॉफ्टवेअरनं अचानक एक मोठा तीन-चार ओळींचा एरर मेसेज देत काम थांबवलं तर अशा वेळी तुम्ही काय कराल?
तुम्ही तुमच्या टेक्निकल टीमला तो एरर मेसेज वाचून दाखविता; मात्र तुम्ही वाचून दाखविलेले एक तर समोरच्याला कळत नाही किंवा तुम्ही एरर मेसेज वाचताना काही तरी गडबड करता. अशा वेळी जर त्या एरर मेसेजचा स्क्रीन शॉट घेऊन जर तुमच्या टेक्निकल सपोर्ट टीमला पाठविला तर तो बघून नेमका कुठे प्रॉब्लेम आहे, हे त्यांना चटकन कळेल. लवकरात लवकर सोल्युशन मिळेल.
२) ऑनलाइन शॉपिंग, ऑनलाइन बँकिंग, ऑनलाइन आयटी रिटर्न अशा अनेक गोष्टी आपण ऑनलाइन करतो. त्यातून एक ट्रान्झ्ॉक्शन नंबर जनरेट होतो. त्याचा स्क्रीन शॉट घेऊन डिजिटल कॉपी ठेवली तर प्रिंटिंगचा खर्च वाचेल. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तेवढीच मदत.
३) आजकाल स्मार्टफोनचा जमाना आहे. मोठमोठय़ा पर्चेस ऑर्डर ई-मेलऐवजी फक्त छोटासा एसएमएस किंवा व्हॉटस् अँपवरून देण्याचा ट्रेण्ड सुरू झाला आहे. तुम्हाला जर पुरावा म्हणून एसएमएस किंवा व्हॉटस् अँप ठेवायचे असतील तर स्मार्टफोनचा स्क्रीन शॉट घेऊन ठेवू शकता. तुमचा स्मार्टफोन खराब झाला तरी महत्त्वाच्या मेसेज स्क्रीन शॉटच्या रूपानं तुमच्याकडे बॅकअप असतो.
www.shikshansanjivani.com
@ sanjay jagtap 9762181706@