तंत्रज्ञानाच्या दुनियेतील टॉप १० उपकरणे

🎯🎯तंत्रज्ञानाच्या दुनियेतील टॉप १० उपकरणे

Maharashtra Times | Sep 20, 2015, 12.11 AM IST
'कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक आणि अप्लायन्सेस'च्या जगातील मोठ्या प्रदर्शनापैकी एक असलेले 'आयएफए' हे प्रदर्शन बर्लिनमध्ये १९२४पासून भरवले जाते. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असते आणि या प्रकारापैकी फार जुन्या असलेल्या प्रदर्शनांपैकी ते एक आहे. या प्रदर्शनाला उपस्थित राहण्यासाठी हितेश राज भगत यांना 'लेनोव्हो'तर्फे आमंत्रित करण्यात आले होते. या प्रदर्शनात सादर करण्यात आलेल्या काही उपकरणांविषयी त्यांनी दिलेली ही माहिती...
लेनोव्हो योगा टॅब थ्री प्रो
लेनोव्होकडून सादर झालेल्या 'योगा टॅब थ्री प्रो'मध्ये अनेक उत्तम फीचर्स आहेत. या टॅबमध्ये 'बिल्ट-इन' प्रोजेक्टर असून, त्याद्वारे ७० इंच स्क्रीनवर प्रोजेक्शन करता येते. प्रोजेक्टर लेन्स अत्यंत योग्य जागी बसवण्यात आली असून, प्रोजेक्शन करताना डिस्प्ले सरळ राहू शकतो. या टॅबचा स्क्रीन १०.१ इंच असून (२५६० बाय १६०० पिक्सेल्स), क्वाड कोअर इंटेल अॅटम प्रोसेसर आहे. या टॅबला दोन जीबी रॅम असून, १६ किंवा ३२ जीबी स्टोअरेज क्षमता आहे. मुख्य म्हणजे याची बॅटरी १०,२०० एमएएच क्षमतेची असून, त्यामुळे एकदा चार्ज केल्यानंतर ती १८ तास चालते. याला समोरच्या बाजूला चार जेबीएल स्पीकर असून, ऑडिओच्या उत्तम अनुभवासाठी डॉल्बी अॅटमॉस्फिअरचा पर्यायही देण्यात आला आहे. सातशे ग्रॅमपेक्षा कमी वजन, अॅल्युमिनिअम बॉडी, वाढवता येणारी मेमरी, लेदर फिनिश बॅक पॅनेल आणि १३ व ५ मेगापिक्सेलचे कॅमेरे ही या टॅबची आणखी काही वैशिष्ट्ये आहेत.

एसर प्रिडेटर एट

एसरची प्रिडेटर सीरिजमधील उत्पादने गेम खेळणाऱ्यांना डोळ्यांसमोर ठेवून बनवण्यात आलेली आहेत. प्रिडेटर एट या टॅब्लेटद्वारे एसर ही कंपनी आता मोबाइल गेमर्सवर आपले लक्ष केंद्रित करू इच्छित आहे. हा नव्याने सादर करण्यात आलेला टॅब्लेट आठ इंची (१९२० बाय १०८० पिक्सेल्स) असून, त्याचे वजन ३५० ग्रॅम आहे. या स्क्रीनचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची कलर गॅमट अॅक्युरसी १०० टक्के आहे. त्याच्या चार कोनांवर असलेले रेड ग्रिल्स केवळ डिझाइनचा भाग नाहीत, तर ते फ्रंट फेसिंग स्पीकर्स असून, गेम खेळताना व्हर्च्युअल सराउंड साउंडचा अनुभव येण्यासाठी ते तसे डिझाइन करण्यात आले आहेत. इंटेल अॅटम एक्स सेव्हन या प्रोसेसरसह आलेला हा पहिलाच टॅब्लेट असून, तो 'मायक्रोसॉफ्ट सरफेस थ्री'मध्येही वापरण्यात आला आहे. दोन जीबी रॅम, ३२ जीबी रॉम ही अन्य फीचर्स आहेत. एसरच्या टॅकसेन्स या तंत्रज्ञानामुळे गेम खेळताना गेम कन्सोल कंट्रोलरप्रमाणे व्हायब्रेशनचा अनुभव येतो.

लेनोव्हो थिंकपॅड योगा

थिंकपॅड हे लेनोव्होच्या लिजंडरी बिझनेस लॅपटॉपना देण्यात आलेले नाव आहे. 'आयबीएम'चा पीसी बिझनेस विकत घेतल्यानंतर हे नावही सोबत आले. कंपनीच्या विविध लवचिक (फ्लेक्झिबल) उपकरणांना योगा हे नाव देण्यात आले आहे. योगा लॅपटॉपचा स्क्रीन वेगवेगळ्या दिशांमध्ये फिरवता येतो आणि त्याचा लॅपटॉप, टॅब्लेट किंवा टेबलटॉपसारख्या अन्य स्वरूपांत वापर करता येतो. उत्तम स्पिल रेझिस्टंट कीबोर्ड, ट्रॅकपॉइंट ही त्याची वैशिष्ट्ये. थिंकपॅड योगा २६० (१२.५ इंच स्क्रीन) आणि थिंकपॅड योगा ४६० (१४ इंच स्क्रीन) अशा दोन व्हर्जन त्यात आहेत.

सॅमसंग गिअर टू

सॅमसंगच्या गिअर या स्मार्टवॉच मालिकेतील गिअर टू हे गोल डिस्प्ले असलेले हे पहिलेच स्मार्टवॉच आहे. हे वॉच सॅमसंगच्याच टायझेन सिस्टीमवर चालते. १.२ इंचाचा सुपर अॅमोएलईडी डिस्प्ले असून, ३६० बाय ३६० पिक्सेलचे रिझॉल्युशन आहे. डिस्प्लेभोवती असलेल्या फिरणाऱ्या बिझेलचा उपयोग नेव्हिगेशनसाठी होतो. हे स्मार्टवॉच केवळ सॅमसंगच नव्हे, तर कोणत्याही अँड्रॉइड फोनसोबत वापरता येते. १.० गिगाहर्ट्झचा ड्युएल कोअर प्रोसेसर, ५१२ एमबी रॅम, चार जीबी स्टोअरेज आणि २५० एमएएच क्षमतेची बॅटरी ही वैशिष्ट्ये आहेत. चार्ज केलेली बॅटरी तीन दिवस चालते, असा दावा आहे.

सोनी एक्स्पेरिया झेड फाइव्ह प्रीमिअम

सोनी कंपनीने एक्स्पेरिया झेड फाइव्ह अंतर्गत एक्स्पेरिया झेड फाइव्ह, झेड फाइव्ह कॉम्पॅक्ट आणि झेड फाइव्ह प्रीमिअम असे तीन फोन लाँच केले आहेत. त्यापैकी प्रीमिअम हा फोन सादर करण्यात आला आहे. फोर के रिझॉल्युशन डिस्प्ले (३८४० बाय २१६० पिक्सेलसह ५.५ इंच) असलेला हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे. त्यामुळे ८०६ पीपीआयची अत्यंत सुंदर पिक्सेल डेन्सिटी आहे. स्टेनलेस स्टील फ्रेम, धूळ आणि पाण्याला प्रतिबंध, तसेच फेज डिटेक्सन ऑटोफोकससह २३ मेगापिक्सेलचा मागचा कॅमेरा, तसेच फोर के व्हिडिओ रेकॉर्डिंग, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८१० प्रोसेसर, तीन जीबी रॅम, ३२ जीबी स्टोअरेज, ३४३० एमएएच बॅटरी, ही याची काही वैशिष्ट्ये.
लेनोव्हो आयडियापॅड एमआयआयएक्स ७००
'एमआयआयएक्स ७००' हा 'सरफेस थ्री'चा क्लोन करण्याचा लेनोव्होचा प्रयत्न आहे. मागचा किकस्टँड आणि मॅग्नेटिक कीबोर्ड डॉक ही फीचर्सही त्यात आहेत. यातील किकस्टँड स्क्रीनला कोणत्याही अँगलमधून सपोर्ट देऊ शकतो. इंटेल कोअर एम सेव्हन प्रोसेसर, आठ जीबी रॅम, २५६ जीबी एसएसडी, २१६० बाय १४४० पिक्सेल्स असलेला १२ इंच टचस्क्रीन, ७८० ग्रॅम वजन (कीबोर्ड डॉकसह), पाच-पाच मेगापिक्सेलचे दोन कॅमेरे, ३.० आणि २.०चे यूएसबी पोर्ट, मायक्रोएसडी, मायक्रो एचडीएमआय आउटपुट, डेटा कनेक्टिव्हिटीसाठी मायक्रो सिम स्लॉट ही याची काही वैशिष्ट्ये आहेत. याची बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर नऊ तास चालेल असा दावा लेनोव्होने केला आहे.

एसर रेव्हो बिल्ड एम १-६०१

हा जगातील पहिला संपूर्णपणे मॉड्युलर डेस्कटॉप पीसी असून, काही सेकंदांत तो अपग्रेड करता येतो. इंटेल प्रोसेसर, इंटेल एचडी ग्राफिक्स, आठ जीबीपर्यंतची रॅम ही याची काही वैशिष्ट्ये. प्रत्येकी तीन टीबीचे एक किंवा अनेक हार्ड ड्राइव्ह ब्लॉक तुम्ही त्याला वर जोडू शकता. प्रत्येक ब्लॉक पिनच्या साह्याने चुंबकीय पद्धतीने जोडता येतो. तुम्हाला हवे तितके ब्लॉक जोडता येतात. बिल्ट इन बॅटरीसह असलेला वायरलेस चार्जिंग ब्लॉक, स्पीपर ब्लॉक आणि पायको प्रोजेक्टर ब्लॉकही याला जोडता येतो.

रिकोह थेटा एस

अगोदरच्या थेटा एम १५ या कॅमेरा मॉडेलमध्ये असलेल्या त्रुटी यात दूर करण्यात आल्या आहेत. याद्वारे ५३७६ बाय २६८८ या रिझॉल्युशनचे फोटो काढता येतात. १०८० पिक्सेलचा व्हिडिओ ३० फ्रेम प्रति सेकंद या दराने चित्रित करता येतो. आठ जीबीपर्यंतची स्टोअरेज क्षमता असून, व्हिडिओ क्लिपची लांबी २५ मिनिटांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

एसस जीएक्स ७००

वॉटर कूलिंग यंत्रणा असलेला हा लॅपटॉप आहे. हे फीचर फार दुर्मीळ आहे. ही यंत्रणा काढून ठेवता येते. जेव्हा भरपूर काम असेल आणि कम्प्युटरकडून स्थिरपणे छान काम करून हवे असेल, तेव्हा ही यंत्रणा सुरू ठेवावी, अन्य वेळी पोर्टेबिलिटीसाठी ती काढून ठेवता येते.

तोशिबा सॅटेलाइट रेडिअस १२

लेनोव्होच्या 'योगा'प्रमाणेच रेडिअस १२ हे उपकरणही लॅपटॉप, टेबलटॉप किंवा टॅब्लेट अशा कोणत्याही स्वरूपात वापरता येते. 'रेडिअस १२'ला फोर के स्क्रीन (३८४० बाय २१६० पिक्सेल्स) असून, असे फीचर असलेले हे पहिले कन्व्हर्टिबल उपकरण आहे. रंग अतिशय उत्तम तऱ्हेने दिसणे हे याचे वैशिष्ट्य. लेटेस्ट सिक्स्थ जनरेशन इंटेल कोअर प्रोसेसर्स यात असून, विंडोज हॅलोही त्यात आहे. (लॉगिनसाठी चेहरा वापरण्याचे फीचर)
मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा
____________________________________________________________________
www.shikshansanjivani.com
@ Sanjay jagtap 9762181706 @

Popular posts from this blog

वाक्प्रचार व अर्थ

......॥जय शिवराय ॥.......

माहिती तंत्रज्ञान अभ्यासक्रम इयत्ता ७ वी