PRC दौरा = काय दक्षता बाळगावी
*PRC दौरा =काय दक्षता बाळगावी*
मु अ व शिक्षकांनी खालील बाबींकडे नियमित,दररोज लक्ष दिल्यास नामुष्की ओढ़ावणार नाही.
१) मुख्याध्यापक कार्यालय अदयावत असावे.
२) मुख्याध्यापकांच्या कार्यालयात वै. लाभांच्या योजना लिहीलेल्या असाव्यात , पट संख्या लिहीलेली असावी.
३) स्वच्छता गृह स्वच्छ असावे , बाहेर साबण व टॉवेल असावा.
४) खेळाचे ग्राऊंड आखलेले असावे.
५) शाळेत ४८ तासांचे वेळापत्रक असावे.
६) परिपाठ २० मि.चा असावा.
७) गणवेश वाटप रजि. अदयावत असावे.
८) शा.पो.आ. दैनंदीन नोंदवहीवरील व शिलक तांदूळ तपासावे.
९) पुरक आहार वाटपाची नोंद ठेवावी.
१०) वजन, उंची नोंद आवश्यक.
११) ताटांचा वापर करावा.
१२) आसन पट्टीचा वापर करावा.
१३) आहार किती शिजवतो ते स्वयंपाकीला माहीत पाहिजे.
१४) किचन शेड स्वच्छ असावे.
१५) मेनूप्रमाणे आहार शिजवावा.
१६) वर्षभरात ४ पालकसभा घ्याव्यात.
१७) आठवडयातून एकदा तक्रार पेटी उघडावी मुख्या. व पालक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत उघडावी.
१८) सर्व शासन निर्णयाची फाईल मुख्या. यांच्या दप्तरी असावी
१९) पायाभूत चाचणीचे गुण फाईल ठेवणे.
२०) प्रत्येक वर्गात आरसा, कंगवा ,नेलकटर व टॉवेलआवश्यक आहे.
२१) सर्वांनीच दररोज सकाळी ९.३०/८.३० पुर्वीच शाळेत आलेले उत्तम.
®🤝®✊®👊®👀®👁
१) स्वच्छ भारत अभियान . २०१४ ला सुरु झाले
२) टॉयलेट स्वच्छ ठेवावे
३) शाळेतील झाडांची व्यवस्थित आकार देवून कटींग करावी
४) शिक्षकांच्या गाTडयांची पार्कींग व्यवस्थीत असावी
५) पार्कींगचा फलक शाळेत लावलेला असावा
६) प्रत्येक वर्गात चालूस्थितीतील घडयाळ असावे
७) शाळेच्या आवारातील मोठी झाडे व विजेच्या तारांची काळजी घ्यावी
८) वेगवेगळ्या योजनांचा गोषवारा ठेवावा
९) सा.स. मु. नोंदी असाव्यात
१०) लोकसहभागाची नोंद दर्शनी भागात असावी
११) स्वयंपाकी करारनामे असावेत
१२) वर्गाची मांडणी व्यवस्थित असावी
१३ ) ग्रंथालय रजि. नोंदी ठेवणे
१४) SSA पासबुक अपडेट करणे
१५) उपक्रमांचे फोटो दिनांकासह फाईल आवश्यक
१६) शाळा सिध्दी फाईल ठेवणे
१७) विदया. ची बैठक व्यवस्था व्यवस्थित असावी
१८) मुख्या.मार्गदर्शीकेचा वापर करावा
१९) सेवा पुस्तक ऑनलाईन भरणे आवश्यक
२० ) १३ कोटी वृक्ष लागवड , वृक्षसंगोपन , संवर्धन .
®®®®®®®®®®
१) परिपाठ व्यवस्थित असावा
२) विदयार्थी व शिक्षक ओळखपत्र असावे
३) PRC काळात रजा मिळणार नाही
४ ) आरोग्य तपासणी २०१४ते अदयाप पर्यंत अपडेट असावेत
५) पट पडताळणी नोंदी आवश्यक
६) SMC बैठक किमान प्रत्येक महिन्याला १ असावी
७) खर्चाच्या मान्यतेचा उल्लेख बैठकीत असावा
८) शाळेतील रेकॉर्ड अद्यावत असावे
९) वर्ग स्वच्छ व सुंदर असावे
१०) विदयार्थ्यांना घडयाळाची वेळ सांगता येणे आवश्यक
११) वर्गातील नेत्यांची व समाज सेवकांच्या फोटोंची नावे विदया.ना सांगता आले पाहिजे
१२) शा.पो.आ.ही योजना १९९५पासूनची योजना असून मेनू फलक किचन शेडमध्ये असावा
चवीसाठी नमूना ठेवावा ,
१३) चव रजि.मध्ये पालकांच्या स्वाक्षऱ्या आवश्यक
१४) पिण्याच्या पाण्याची सुविधा असावी
१५) स्वच्छतेचे संदेश मुलांना येणे आवश्यक
१६) SSGम्हणजे स्वच्छ सर्वे. २०१८ विषयी शिक्षकांना माहिती पाहीजे
१७) शाळेत तक्रार पेटी असावी
१८) धम्रपान निषेध फलक असावा
१९) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप रेकॉर्ड अदयावत असावे
२०) पालक भेट राजि.असावे
२१) सातत्यपूर्ण सर्वंकश मुल्य.रजि. अदयावत असावे
२२) SSAअभिलेखे अदयावत असावे
२३) व्याज खर्च करू नये
२४ ) शाळेमध्ये घंटा असावी
२५)पेटीतील साहित्यांचा वापर करावा
२६) श्रवण ,भाषण, वाचन ,लेखन या मुलभूत क्रिया मुलांना येणे आवश्यक
२७) गणिती क्रिया मुलांना येणे आवश्यक
२८) शाळेचे वेळापत्रक दर्शनी भागात असावे
२९) लोकसहभागचा फलक दर्शनी भागावर लावावा
®®®®®®®®®®