" कुस्ती खेळ - माहिती "
*खेळाचे नाव*
*🏅कुस्ती🏅*
*खेळाचा उद्देश*
👊🏻 मल्लयुध्दाचा मुख्य उद्देश *प्रतिस्पर्धास नामोहरम करणे* हा आहे.
👊🏻 त्यासाठी शरीरास योग्य त्या व्यायामाने बलवान करून त्या बलाचा युक्तीने वापर करावा लागतो.
👊🏻 मल्लयुध्दासाठी पुर्वतयारी म्हणून विविध प्रकारच्या व्यायाम साधनांचा वापर करून शरीर सुदृढ, काटक व बलवान करून आत्मविश्वास वाढविणे जरूर आहे.
👊🏻 बलसंर्वधनासाठी व्यायाम, युक्ताहार, ब्रह्मचर्य, सदाचार यांचे पालन करावे लागते.
*कुस्तीच्या विविध पध्दती*
👊🏻 मल्लयुध्दाची वाढ व तिचा जागतिक प्रसार गेल्या दीड-दोन शतकांत फार झपाटयाने होऊन ते एक स्वतंत्र शस्त्रच बनत चालले आहे.
👊🏻 मल्लविद्येच्या विविध पध्दती अनेक राष्ट्रांत प्रचलित असल्या, तरी त्यांतील मूलभूत तत्त्वे सामान्यत: एकसारखीच आहे.
👊🏻 अर्वाचीन काळात प्राचीन ऑलिंपिक क्रीडासामन्यांचे पुनरूज्जीवन झाल्यामुळे व त्यातही मल्लयुध्दाला विशेष प्राधान्य दिले गेल्यामुळे मल्लविद्येला जागतीक मान्यता मानली.
👊🏻 आपापल्या राष्ट्रांतील नामांकित मल्ल म्हणून घेण्यापेक्षा आंतरराष्ट्रीय मल्ल किंबहुन जगज्जेता होण्याची ईर्षा निर्माण होऊ लागली.
*कुस्तीच्या विविध पध्दती प्रचलित आहेत.*
🌎भारतीय कुस्त्यांचे *चार प्रमुख प्रकार पडतात* ते असे:-
*1) हनुमंती कुस्ती :-* बुध्दीच्या जोरावर प्रतिपक्षावर मात करण्याचे डावपेच असलेला प्रकार. पौराणिक कल्पनेनुसार या कुस्तीच्या प्रकाराचा *कर्ता रामायण काळातील हनुमान* असून त्याने बुध्दिच्या जोरावर शक्तीवर मात करता येईल असे डावपेच निर्माण केले आहेत. शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ हे तत्त्व या प्रकारच्या कुस्तीत प्रमुख्याने आढळते त्यामुळे प्रतिस्पर्धी शरीराने व बलाने मोठा असला तरी त्यावर मात करता येते. या वरून या कुस्ती प्रकारास *हनुमंती कुस्ती* हे नाव पडले.
*2) भीमसेनी कुस्ती :-* शरीर सामर्थ्यावर प्रतिस्पर्ध्याला चीत करण्याचे डावपेच असलेला प्रकार. या प्रकाराच्या कुस्तीत केवळ शरीरबलावर आधारित असे अनेक डावपेच आहेत. महाभातात पांडवापैकी *भीम हा मल्लविद्येत प्रविण होता,* तसेच तो अत्यंत बलवानही होता. त्याने आपल्या प्रचंड सामर्थ्यावर जीमूत, कीचक, बकासुर, जरासंघ यांचा नि:पात केला होता. यावरून या कुस्तीप्रकारास *भीमसेनी कुस्ती* हे नाव पडले.
*3) जांबुवती कुस्ती :-*विविध डावपेचांनी प्रतिस्पर्ध्याला बांधून शरण यावयास लावणारा प्रकार. यात प्रतिस्पर्ध्याला चीत न करता विविध डावपेचांनी त्याचे हातपाय बांधून त्याला ताब्यात घेऊन *शरणागती पत्कारवयास लावणे,* या गोष्टीवर प्रामुख्याने भर दिला जातो. याच एका दृष्टीकोणातून यातील डाव, पेच व पकडा बसविलेल्या आहेत.
*4) जरासंधी कुस्ती :-* प्रतिस्पर्ध्याचा *संपूर्ण नि:पात* करण्याचे डावपेच असलेला प्रकार. महाभारतात भीम व जरासंध यांच्या मल्लयुध्दाचे वर्णन आहे. भीमाला जरासंधावर बराचवेळ मात करता येईना: तेव्हा श्रीकृष्णाने भीमाला एक गवताची काडी चिरून तिचे दोन भाग उलट सुलट टाकून सूचना केली व त्या सुचनेचा अवलंब केल्यामुळे भीमाने जरासंधाला दोन्ही पाय ताणून चिरून ठार केले. तेव्हा या प्रकारच्या कुस्तीत प्रतिस्पर्ध्याला जायबंदी करण्याच्या किंवा जीव घेण्याच्या दृष्टी डावपेच बसवलेले आहेत. प्रतिस्पर्ध्याला कोणत्याही प्रकाराने *कायमचा नेस्तनाबूद करण्याच्या* प्रमुख तत्त्वावर हे डावपेच आधारित आहेत.
💥वरील चार प्रकारांतील *शरीरास इजा होणाऱ्या डावपेचास* कालांतराने मनाई होत गेली आणि *कुस्तीला खेळाचे स्वरूप* आले.
💥 अलीकडे भारतात हनुमंती, भीमसेनी, जांबुवती या प्रकारांतील नीरूपद्रवी डावपेचांचे मिश्रण असलेला कुस्तीप्रकार प्रचारात आहे.
*कुस्तीची साधने*
*1) आखाडा*
🚏भारतीय पध्दतीत ५ × ५ मी. लांबीरूंदीचा व १ मी. खोलीचा आखाडा लागतो.
🚏त्यांत ५० सेंमी. जाडीची तांबडी माती, काव व राख घालतात. त्यावर प्रथम पाणी, लिंबाचा रस, ताक, तेल यांचा वापर करून तो मऊ व निर्जंतुक करून घेतात.
🚏वारंवार पाणी मारून ती खो-याने दररोज तोडून भुसभुशीत ठेवावी लागते.
🚏विदेशी पध्दतीच्या सर्व प्रकारच्या कुस्त्यांना ६×६ मी. लांबीरूंदीचा उंचावलेला आखाडा असतो.
🚏त्यावर जाड काथ्याची चटई पसरतात, त्यामुळे खेळाडू फेकले वा आपटले गेल्यास इजा होत नाही.
🚏या आखाडयासभोवती खेळाडू बाहेर जाऊ नये म्हणून जाड दोरखंडे बांधतात.
*2) कुस्तीचा पोशाख*
🚏देशी पध्दतीत लंगोट व त्यावर जाड, घट्ट बसणारा असा जांघिया (किश्तक) घालतात.
🚏खेळाडूस सामन्याच्या वेळी अंगास तेल लावण्यास मनाई आहे.
🚏विदेशी पध्दतीत थंड हवामानामुळे, बनियन व चड्डी व पायात बूट घालून कुस्ती खेळतात.
*✍🏼 कुस्तीचे नियम ✍🏼*
✍🏼 प्रत्येक कुस्ती पध्दतीचे *स्वतंत्र असे नियम* असतात व ते कटाक्षाने पाळणे खेळाडूंचे कर्तव्य आहे.
✍🏼 ते तसे पाळले जातात किंवा नाही हे पाहण्याचे काम *पंचांचे* असते.
✍🏼 पंच व सरपंच हे कुस्ती चालू असतांना देखरेख ठेऊन, शेवटी *कुस्ती निकाली न झाल्यास,* चांगल्या कुस्तीगीरास त्याच्या *डाव-पेच-पकडी यांवर गुण देऊन त्याला विजयी ठरवितात.*
✍🏼 कुस्ती होण्यापूर्वी कुस्तीगारांची वजने घेऊन वजनाप्रमाणे त्या त्या वजनांच्या गटात त्यांना खेळावे लागते.
✍🏼 ऑलिंपिक सारख्या जागतिक सामन्यांत कुस्तीगारांच्या *वजनांचे आठ गट* आहेत.
✍🏼 काही सामन्यात प्रत्येक गटात दाखल असलेल्या सर्व खेळाडूंना आळीपाळीने त्या *गटातील प्रत्येकाशी खेळावे लागते* व त्यात शेवटी प्रत्येकाला प्रत्येकाशी खेळलेल्या कुस्तीत मिळालेल्या गुणांची बेरीज करुन प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक देण्यात येतात.
✍🏼 काही पध्दतींत जोडया पाडून शेवटपर्यंत सर्व फे-या जिंकत जाऊन शेवटी जिंकणारा विजेता व हरणारा उपविजेता ठरवितात.
✍🏼 काही पध्दतींत खेळाडूने केलेल्या दोषांबद्दल त्याचे दोषगुण उणे करण्यात येतात.
✍🏼 त्यामुळे पुष्कळदा कमी गुण मिळवणारा विजेता ठरतो.
✍🏼 पंच-सरपंचांनी दिलेले निकाल बंधनकारक मानतात.
*प्रसिध्द भारतीय कुस्तीगीर*
💥 भारतीय मल्लविद्येचे श्रेष्ठत्व जगाला पटवून देणा-या जगज्जेत्या *गामाचे* नाव अजरामर झाले आहे.
💥 इ. स. १९१० साली त्याने लंडन येथे कुस्तीचे जागतिक अजिंक्य पद मिळविले.
💥ह्या दोघांच्या तोडीचा *गुंगा* नावाचा पैलवानही प्रसिध्द आहे.
💥 *गुलाम अलिया* याने इ. स. १९०२ मध्ये युरोपातील सर्व प्रसिध्द मल्लांना जिंकून *रुस्तम-ए-हिंद* ही पदवी मिळविली होती.
💥 *कल्लू अलिया* व त्याचा मुलगा *गामा कल्लू* हेही सुप्रसिध्द मल्ल होते.
💥 *अहमदबक्ष* या मल्लाने इ. स. १९१२ मध्ये युरोपात जाऊन तेथील मध्यमगट वजनाच्या सर्व प्रसिध्द पैलवानांना हरविले होते.
*🏆भारताची ऑलिंपिक🏆*
🏓 क्रीडासामन्यांतील कामगिरी
इ. स. १९२० साली *सर दोराबजी टाटां* यांच्या सक्रिय सहानुभूतीने काही कुस्तीगार व खेळाडू *ऍंटवर्प ऑलिंपिक* सामन्यासाठी गेले होते.
🏓 त्यावेळी *शिंदे* याने कुस्तीत थोडी चुणूक दाखविली.
🏓 त्यानंतर इ. स. १९४८ च्या लंडन ऑलिंपिक क्रिडासामन्यात भारताच्या *खाशाबा जाधवने* फ्रीस्टाईल कुस्तीच्या फ्लायवेट गटात दोन कुस्त्या जिंकून सहावा क्रमांक मिळविला.
🏓 पुढे इ. स. १९५२ च्या हेलसिंकीच्या ऑलिंपिक सामन्यात मात्र त्याने बँटमवेट गटात तिसरा क्रमांक मिळवून भारताला एकमेव *ब्राँझ पदक* मिळवून दिले.
🏓 त्याच सामन्यात *के. डी. माणगावे* याचा पाचवा क्रमांक लागला.
🏓 इ. स. १९५६ च्या मेलबर्न ऑलिंपिक सामन्यात भारताच्या *उदयचंद, ग्यान, एस्. श्याम, महादेवसिंग* यांनी आपापल्या पहिल्या फे-या जिंकल्या व सज्जनसिंह याने दोन फे-या जिंकल्या, पण पुढे त्यांचा प्रभाव पडला नाही.
🏓 इ. स. १९६४ च्या टोकियो सामन्यात फ्रीस्टाईल कुस्तीत *विश्वंभर* सहावा आला.
*ताजी बातमी*
*कुस्तीपटू साक्षीनं पटकावलं कांस्यपदक*
रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला महिला कुस्ती स्पर्धेत पहिलं पदक मिळालं. कुस्तीपटू साक्षी मलिकनं ५८ किलो वजनी गटात किर्गिजस्तानच्या टिनीबेकोव्हला ७-५ नं धोबीपछाड देत कांस्यपदकावर आपलं नाव कोरलं.
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
*📈आरोग्याचे रक्षण📉*
*🏆 *शारीरिक शिक्षण*🏆
======================
www.shikshansanjivani.com