संपूर्ण आयुर्वेद { घरचा वैद्य }

-----------:♦ संपूर्ण आयुर्वेद { घरचा वैद्य } ♦:-----------

-:♦ हे वाचल्यावर अक्षरशः काही वाचायची गरज नाही 
-:♦ वाचा आणि पालन करा.

-:♦ शरीराला आवश्यक खनिजं :------------ 

🔺 "कॅल्शिअम" कशात असतं ? :------------ 

|| शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी. ज्वारी, 
|| राजगिरा, खरबूज, खजूर 

-:🔸 कमतरतेमुळे काय होतं ? :------------ 

|| हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे 

-:🔸 कार्य काय असतं ? :------------ 

|| शरीरातील सर्वात मुख्य खनिजं असून ते हाडांची मजबुती 
|| आणि शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं.

🔺 "लोह" कशात असतं ? :------------ 

|| खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक, 
|| सीताफळ, उस, बोर, मध, पपई आणि मेथी 

-:🔸 कमतरतेमुळे काय होतं ? :------------ 

|| शरीरात रक्ताची कमतरता भासते. अशक्तपणा, कावीळ 
|| किंवा पोटात मुरडा येतो. 

-:🔸 कार्य काय असतं ? :------------ 

|| शरीराच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक असतं. 

🔺 "सोडिअम" कशात असतं ? :------------ 

|| मीठ, पाणी, बटाटा, आलं, लसूण, कांदा, मिरची, 
|| पालक, सफरचंद, कारलं 

-:🔸 कमतरतेमुळे काय होतं ? :------------ 

|| रक्तदाबाशी निगडित समस्या, निद्रानाश, अंगदुखी, 
|| अपचन, मूळव्याधीसारखे आजार, मोतीबिंदू, बहिरेपणा, 
|| हात अणि पाय कडक होणे.

-:🔸 कार्य काय असतं ? :------------ 

शरीराला आवश्यक असणारी पाचक रसायनाची निर्मिती करतात, त्याचप्रमाणे शरीरात होणारा गॅस नष्ट होतो. 

🔺 "आयोडिन" कशात असतं ? :------------ 

|| शिंघाडा, काकडी, कोबी, राजगिरा, शतावरी, 
|| मीठ आणि लसूण. 

-:🔸 कमतरतेमुळे काय होतं ? :------------- 

|| थायरॉइडची समस्या, केस गळणे, डिप्रेशन किंवा बैचेनी येणे 

-:🔸 कार्य काय असतं ? :------------ 

|| शरीरात उत्पन्न होणाऱ्या विषारी पदार्थापासून मेंदूला 
|| बचावण्याचं काम करतो. 

🔺 "पोटॅशिअम" कशात असतं ? :------------ 

|| सर्व प्रकारची धान्य, डाळ, संत्र, अननस, केळं, बटाटा, 
|| लिंबू, बदाम. 

-:🔸 कमतरतेमुळे काय होतं ? :------------ 

|| अ‍ॅसिडिटी, त्वचेवर सुरकुत्या किंवा मुरुमं येणं, 
|| त्वचा रोग, केस पिकणे. 

-:🔸 कार्य काय असतं ? :------------ 

|| शरीरात तंतू आणि यकृत यांना सुरळत ठेवण्याचं कार्य करतं 

🔺 "फॉस्फरस" कशात असतं ? :------------ 

|| दूध, पनीर, डाळी, कांदा, टोमॅटो, गाजर, जांभळं, पेरू, 
|| काजू, बदाम, बाजरी आणि चणे. 

-:🔸 कमतरतेमुळे काय होतं ? :------------ 

|| ऑस्टिओपोरोसिस, गतिमंद होणे, मानसिक थकवा, दंत रोग 

-:🔸 कार्य काय असतं ? :------------ 

|| मेंदूला ताजंतवानं ठेवण्याचं काम हे खनिजं करतं. 

🔺 "सिलिकॉन" कशात असतं ? :------------ 

|| गहू, पालक, तांदूळ, कोबी, काकडी, मध, 

-:🔸 कमतरतेमुळे काय होतं ? :------------ 

|| कॅन्सर, त्वचारोग, बहिरेपणा, केस गळणे. 

-:🔸 कार्य काय असतं ? :------------ 

|| जननेंद्रियांची कार्यक्षमता वाढवून शरीरातील तंतूना 
|| मजबूत करतात. 

🔺 "मॅग्नेशिअम" कशात असतं ? :------------ 

|| बाजरी, बीट, खजूर, सोयाबीन, दूध, लीची, कारलं. 

-:🔸 कमतरतेमुळे काय होतं ? :------------ 

|| उदास होणे, आळस येणे, तणाव असणे, झोप न लागणे, 
|| बैचेनी, सोरायसिस, फोडं, नपुंसकता किंवा वांझपणा.

-:🔸 कार्य काय असतं ? :------------ 

|| पेशीचं कार्य सुधारतं. रेचक म्हणून काम करतं. 

🔺 "सल्फर" कशात असतं ? :------------ 

|| दूध, पनीर, डाळ, टोमॅटो, बटाटा, आलं, मिरची, 
|| सफरचंद, अननस, सुरण.

-:🔸 कमतरतेमुळे काय होतं ? :------------ 

|| प्रतीकारशक्ती कमी होते, केस गळतात, वजन वाढतं, 
|| मधुमेहाला आमंत्रण मिळतं. 

-:🔸 कार्य काय असतं ? :------------ 

|| इन्सुलिनचं रेचन म्हणून कार्य करतं. 

🔺 "क्लोरिन" कशात असतं ? :------------ 

|| पानी, बीट, कोबी, मीठ, दूध, लिंबू, आवळा, मध.

-:🔸 कमतरतेमुळे काय होतं ? :------------ 

|| अ‍ॅसिडिटी, अल्सर, कॅन्सर, आणि अ‍ॅलर्जी.

-:🔸 कार्य काय असतं ? :------------ 

|| सोडिअम आणि पोटॅशिअमला पाचक बनवण्यासाठी 
|| सहायता करतं, त्याचप्रमाणे शरीरातील आम्लक्षाराचं 
|| संतुलन राखलं जातं. 

-:♦ खाद्यपदार्थामधील खनिजं शरीराला मिळावीत :------- 
-:♦ म्हणून काय केलं पाहिजे :------------ 

-:🔸 फळं किंवा भाज्या कापल्यानंतर कधीच धुवू नयेत. 
|| असं केल्याने त्यातील खनिजं पाण्यावाटे नष्ट होतात.

-:🔸 डाळ, तांदूळ किंवा धान्यदेखील उकडण्यापूर्वीच 
|| स्वच्छ धुऊन घ्यावेत.

-:🔸 काही धान्य, फळं तसंच भाज्यांच्या सालींमध्ये 
|| खनिजांचा मोठा प्रमाणावर साठा असतो. 
|| त्यामुळे अशा सालींचा आहारात समावेश करावा.

-:🔸 दुधात खनिजांचा भरपूर स्रेत असतो म्हणूनच दूध 
|| जास्त प्रमाणात उकळू नये. दूध जास्त प्रमाणात 
|| उकळल्याने त्यातील खनिजं नष्ट होतात.

-:🔸 फळं कापून खाण्याऐवजी शक्यतो आहे तशीच खावीत 
|| उदाहरणार्थ, चिकू किंवा सफरचंद ही फळं संपूर्ण खावीत. 

-:♦ ब्लड प्रेशर आणि नियंत्रण :------------ 

|| ब्लडप्रेशर असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस 
|| वाढतच चालली आहे. धकाधकीच्या जीवनात फास्ट फूड 
|| आणि अनियमित दिनचर्या या कारणामुळे या आजाराचे 
|| रुग्ण भारतातही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. 

|| ब्लडप्रेशरमुळे हृदयाचे आजार, स्ट्रोक अशा समस्या 
|| निर्माण होण्याची दाट शक्यता असते. ब्लडप्रेशरच्या 
|| रुग्णाला दररोज औषध घ्यावे लागते. 

|| आज तुम्हाला काही घरगुती उपायांची माहिती देत आहोत. 
|| तुम्हालाही ब्लडप्रेशरचा त्रास असेल तुम्ही हे घरुगुती उपाय 
|| अवश्य करून पाहा. या उपायांनी तुमचे ब्लडप्रेशर 
|| नियंत्रणात राहील. 

-:♦ लसूण :------------ 

|| ब्लडप्रेशरच्या रुग्णांसाठी लसूण अमृतासमान औषधी 
|| आहे. यामध्ये एलिसीन नावाचे तत्त्व असते, जे नायट्रिक 
|| ऑक्साइडचे प्रमाण वाढवते आणि यामुळे आपल्या 
|| मासपेशींना आराम मिळतो. ब्लडप्रेशरच्या डायलॉस्टिक 
|| आणि सिस्टॉलिक कार्यप्रणालीला आराम मिळतो. 
|| यामुळे ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी दररोज लसणाची एक 
|| पाकळी अवश्य खावी. 

-:♦ शेवगा :------------ 

|| यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि व्हिटॅमिन तसेच 
|| खनिज लवण आढळून येतात. एका संशोधनानुसार, या 
|| झाडाच्या पानांचा अर्क पिल्यास ब्लडप्रेशरच्या 
|| डायलॉस्टिक आणि सिस्टॉलिक कार्यप्रणालीवर 
|| सकारत्मक प्रबाव पडतो. ब्लडप्रेशरच्या रुग्णाने मसूरच्या 
|| डाळीसोबत शेवग्याचे सेवन करावे. 

-:♦ जवस :------------ 

|| जवसामध्ये अल्फा लिनोनेलिक अ‍ॅसिड भरपूर प्रमणात 
|| असते. हे एक प्रकारचे महत्त्वपूर्ण ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड 
|| आहे. विविध संशोधनामध्ये समोर आले आहे, की ज्या 
|| लोकांना हायपरटेन्शनची समस्या असेल त्यांनी जेवणात 
|| जवसाचा उपयोग अवश्य करावा. यामुळे कॉलेस्टेरॉलची 
|| मात्रा कमी होते आणि याच्या सेवनाने ब्लडप्रेशर 
|| नियंत्रणात राहते. 

-:♦ विलायची :------------ 

|| एका संशोधनानुसार विलायचीचे नियमित सेवन केल्यास 
|| ब्लडप्रेशर व्यवस्थित राहते. याच्या सेवनाने शर हळद Turmeric 

-:♦ गुणधर्म :------------ 

|| तिखट, कडवट, रूक्ष, गरम, जंतुनाशक, रक्तशुद्धीकारक, 
|| वात, पित्त, कफ शमन करणारी.

-:♦ उपयोग :------------ 

१ } जखमेवर किंवा मुका मार लागणे :----- हळद लावा.
२ } रक्ती मुळव्याध :----- बकरीचे दूध  +  हळद घ्या.
३ } सर्दी, कफ, खोकला :----- गरम दूध + तूप + हळद घ्या.
४ } जास्त लघवी :----- पांढरे तीळ + गुळ + हळद घ्या.
५ } आवाज़ बसणे :----- हळद + गुळ गोळ्या करून खा.
६ } काविळ :----- ताक + हळद.
७ } ताप :----- गरम दूध + हळद + काळीमिरी पुड.
८ } लघवितून पू जाणे :----- आवळा रस + हळद + मध.
९ } मुतखडा { स्टोन } :----- ताक + हळद + जूना गुळ.

---------------------:♦ आरोग्य संदेश ♦:--------------------- 
     
|| हळदच आहे जंतुनाशक, रक्तशुद्धीकारक, 
|| नक्कीच आजारांना आहे ती मारक. 

-:♦ तोंडाचे विकार :------------ 

-:♦ कारणे :------------ 

|| जागरण करणे, जास्त तिखट खाणे, पोट साफ नसणे, 
|| पित्त होणे, अपचन होणे, उष्णता वाढणे, रोगप्रतिकारक 
|| शक्ति कमी होणे. व्यसन करणे. 

-:♦ उपाय :------------ 

१ } जेवणात गाईचे तूप व ताक घ्या.
२ } गुलकंद खा. 
३ } ज्येष्ठमधाची कांडी चघळावी. 
४ } दुधाची साय आणि शंखजीरे मिक्स करून तोंडातून लावा 
५ } हलका आहार घ्या.
६ } वरील कारणे कमी करा. त्रिफळा चूर्ण घेऊन पोट साफ ठेवा 
७ } दही उष्ण असल्याने जास्त खाऊ नका.
८ } जाईची पाने किंवा तोंडलीची पाने किंवा पेरूची पाने किंवा उंबराची कोवळी कांडी चावून थुंका.
९ } नियमित प्राणायाम करा.
१० } आवळा पदार्थ खा. 
११ } एकाचवेळी सर्व उपाय करू नका. 

-:♦ जीभेची साले निघत असल्यास :------------ 

-:♦ उपाय :------------ 

१ } पुदिन्याची पाने आणि खडीसाखर मिक्स करून चावून थुंकत रहा. 
२ } एक केळ गाईच्या दूधाबरोबर खावे. 
३ } त्रिफळाच्या काड्याने गुळण्या करा. जंतुसंसर्ग कमी होतो 

--------------------:♦ आरोग्य संदेश ♦:-------------------- 

-:♦ व्यायामानेच पचनशक्ती वाढवा :------------ 

-:♦ उपाय :------------ 

१ } नारळाची शेंडी जाळून राख बनवा.
२ } ती राख २/३ ग्रँम ताकातून घ्या.
३ } रिकाम्या पोटीच घ्या.
४ } सकाळ व संध्याकाळ घ्या.
५ } मुळा / सुरण भाजी खा.
६ } अक्रोड खाऊन वर दूध प्या.
७ } जेवणात कच्चा कांदा खा.
८ } श्वास रोखू बटरफ्लाय व्यायाम करा.
९ } हलका आहार घ्या. गाईचे तुप खा.
१० } पोट साफ ठेवा.
११ } नियमित प्राणायाम करा.
१२ } चोथायुक्त पदार्थ खा.
१३ } शाकाहारी राहण्याचा प्रयत्न करा.
१४ } एकाचवेळी सर्व उपाय करू नका. 

--------------------:♦ आरोग्य संदेश ♦:-------------------- 

-:♦ पोट राहूद्या नियमित साफ, मुळव्याधीचा चूकेल व्याप 

-:♦ काळ्या द्राक्षांचे १० फायदे, वाचाल तर रोज खाल 

१ } डायबिटीस, ब्लड प्रेशरवर नियंत्रण :------------ 

|| काळी द्राक्ष नियमित खाल्यामुळे डायबिटीस आणि ब्लड 
|| प्रेशर नियंत्रणात राहतं. काळ्या द्राक्षांमध्ये रेसवटॉल 
|| नावाचा पदार्थ असतो, ज्यामुळे रक्तात इन्सुलिन वाढतं. 
|| ही द्राक्ष खाल्यामुळे शरिरातलं रक्त वाढायलाही मदत होते 
|| त्यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास होत नाही. 

२ } एकाग्रता वाढायला मदत :------------ 

|| काळी द्राक्ष खाल्यामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती 
|| वाढायला मदत होते. तसंच मायग्रेनसारखा आजारही 
|| या द्राक्षांमुळे बरा होतो. 

३ } हार्ट ऍटेकचा धोका कमी :------------ 

|| काळ्या द्राक्षांमध्ये सायटोकेमिकल्स असतात जे हृदयाला 
|| स्वस्थ ठेवतात. तसंच या द्राक्षांमुळे कोलेस्ट्रॉलही 
|| नियंत्रणात राहतं, ज्यामुळे हार्ट ऍटेकचा धोका कमी होतो.

४ } वजन होतं कमी :------------ 

|| नियमित काळी द्राक्ष खालली तर वजन कमी होऊ शकतं. 
|| यामध्ये असणारा एँटीऑक्साईड शरिरात जास्तीचं 
|| असलेलं टॉक्सिन्स बाहेर काढायला मदत करतो. 
|| ज्यामुळे वजन कमी होतं. 

५ } अस्थमा होतो बरा :------------ 

|| काळी द्राक्ष शरिरात असलेल्या बॅक्टेरिया आणि फंगसला 
|| मारायचं काम करतात, जी इंफेक्शन तयार करतात. 
|| पोलिओविरुद्ध लढण्यासाठीही द्राक्ष हा चांगला उपाय 
|| आहे. काळ्या द्राक्षांमुळे अस्थमा बरा व्हायला मदत होते. 

६ } कॅन्सरला रोखा :------------ 

|| काळी द्राक्ष खाल्यामुळे ब्रेस्ट, लंग, प्रोस्टेट आणि 
|| आतड्यांच्या कॅन्सरच्या धोक्यापासून वाचता येऊ शकतं. 

७ } अपचन होत नाही :------------ 

|| काळ्या द्राक्षांमध्ये शुगर, ऑरगॅनिक ऍसिड आणि 
|| पॉलीओस जास्त प्रमाणात असल्यामुळे अपचन आणि 
|| पोटाची जळजळ होत नाही. 

८ } डोळ्यांसाठी गुणकारी :------------ 

|| दृष्टी सुधारण्यासाठीही काळी द्राक्ष गुणकारी आहेत. 

९ } सुरकुत्या होतात कमी :------------ 

|| काळ्या द्राक्षांमुळे डोळ्यांखाली होणारा काळा भाग कमी 
|| करतो. तसंच त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्याही यामुळे कमी 
|| होतात. 

१० } केस गळती थांबवायला मदत :------------ 

|| काळ्या द्राक्षांमध्ये असलेल्या विटॅमिन इ मुळे केस गळणं, 
|| केस पांढरे होणं यासारख्या समस्या दूर होतात. द्राक्ष 
|| खाल्यानं केसांच्या मुळापर्यंत रक्त पोहोचायला मदत होते, 
|| त्यामुळे केस मुलायम आणि मजबूत होतात. 

-:♦ शरीरावरील काळे डाग :------------ 

-:♦ उपाय :------------ 

१ } नियमित प्राणायाम करा.
२ } पचनशक्ती स्ट्राँग ठेवा.
३ } पोट साफ राहूद्या.
४ } पालेभाज्या व फळभाज्या खा.
५ } कोरफड पानातील गर लावा.
६ } आवळा रस / पदार्थ घ्या.
७ } डागांवर कच्च्या पपईचा रस लावा.
८ }कडुलिंबाची पाने आंघोळीच्या पाण्यात टाकून पाणी 
|| उकळवून घ्या. नंतर त्याच पाण्याने आंघोळ करा. 
|| मात्र साबण वापरू नका.
९ } सकाळी ऊठल्यावर तोंडातील लाळ सर्व डागांवर 
|| चोळून लावा. तोंड धुण्यापूर्वीची लाळ पाहिजे. 
|| हा जबरदस्त उपाय आहे. 

--------------------:♦ आरोग्य संदेश ♦:------------------- 

|| करा योग, पळतील रोग. संपतील भोग. 

-----------:♦ नियोजनबद्ध आहार कोणता ? ♦:------------

|| आपला भारतीय संस्कृतीतील आहार योग्य आहे. भाजी, 
|| पोळी, भात, आमटी, पोहे, उपमा हे पदार्थ अतिशय 
|| पौष्टिक आहेत. आपण आपला आहार सोडून अन्य 
|| पदार्थांचे पर्याय शोधतो. म्हणून खाद्यसंस्कृती बदलते 
|| आहे. आपले वेगळेपण आपणच जपले पाहिजे. आपल्या 
|| चौरस आहाराची किंमत आपल्यालाच समजत नाही, 
|| याची खंत आहे. 

-:♦ वाढलेली चरबी कशी कमी करावी ? 🏃 :------------ 

|| आपल्या खाण्या-पिण्याला शिस्त असेल, तर चरबी 
|| वाढणार नाही. वाढली तरी कमी होण्यासही मदत होईल. 
|| सलग ३० मिनिटे एका जागेवर बसू नका. 
|| आपण शरीराचा पुरेसा वापर करीत नाही म्हणून चरबी 
|| वाढते. दरवर्षी अर्ध्या किंवा एक किलोने वजन वाढते. 
|| वजन वाढते, याचा अर्थ आपण आळशी होत आहोत, 
|| हे समजून घ्या. म्हणून गरज आहे ती "मूव्ह मोअर अँड 
|| सिट लेस" या मंत्राची. 

-:♦ कोणती फळे खावीत ? :------------ 

|| आंबा, केळे, सीताफळ, चिकू आणि द्राक्ष ही फळे प्रत्येक 
|| भारतीयाच्या आहारात आवर्जून आलीच पाहिजेत. 
|| आरोग्यासाठी केळे हे सर्वोत्तम असल्याचा दुजोरा आता 
|| जगभरातून मिळत आहे. बाळाच्या आहारातही आईच्या 
|| दुधानंतर फळांमध्ये केळ्याचाच समावेश होतो.

-:♦ मधुमेहासाठी आहार कसा असावा ? :------------ 

|| खरं तर मधुमेहींनी जे पदार्थ खाल्ले पाहिजेत, तेच पदार्थ 
|| डॉक्टर टाळण्यास सांगतात. मात्र, भात, केळं आणि 
|| तुपाचा समावेश आहारात अवश्य असावा. 
|| दोन जेवणांमध्ये फार अंतर ठेऊ नये, व्यायाम भरपूर 
|| करावा आणि अगदी झोपेपर्यंत टीव्ही पाहणे टाळावे.

-:♦ शुगर-फ्रीचा वापर करावा का ? :------------ 

|| शुगर फ्री आहारातून वर्ज्यच करा. आहारात जेवढी साखर 
|| आवश्यक असते, तेवढी खावी. लाडू, हलवा यासारख्या 
|| घरी बनणाऱ्या गोड पदार्थांत वापरली जाणारी साखर 
|| आरोग्यासाठी चांगली असते. ऊस आणि गूळ यांना 
|| एकमेकांशी रिप्लेस करू नये. आवश्यकतेनुसार पदार्थात 
|| साखर किंवा गुळाचा वापर करावा. शरीरातील उष्णता 
|| वाढवायला गुळाची मदत होते.

-:♦ वाढतं वजन आणि ताण यांचा संबंध कसा आहे ? :--- 

|| वाढत्या ताणामुळे वजन वाढतं. फर्गेट, फर्गिव्ह आणि 
|| फॉर्वर्ड या सूत्रानुसार जीवन जगायला सुरवात केल्यास 
|| आयुष्यातील तणाव कमी होतील.

-:♦ कडधान्य कशी खावीत :------------ 

|| आपण उसळ करताना कडधान्य शिजवून घेतो. त्यामुळे 
|| मोड आलेली कडधान्ये कच्ची कशासाठी खायची ? 
|| ती उकडून, उसळ करून खाणेच योग्य.

-:♦ जेवणात कोणते तेल आणि किती वापरावे ? :-------- 

|| शेंगदाण्याचे घाण्यावरून करून आणलेले तेल 
|| स्वयंपाकासाठी सर्वोत्तम आहे. शंभर ग्रॅम शेंगदाण्याचे 
|| २५ ते ३० टक्के तेल निघते. बाकी चोथा वाया जातो. 
|| तेल बनविण्याची पारंपरिक पद्धत अतिशय शुद्ध आहे. 
|| आहारात तेल बदलण्याची गरज नसते. पिशव्या किंवा 
|| डब्यांमध्ये मिळणारे आणि हृदयाच्या आकाराचे चित्र 
|| डब्यांवर दिसणारे तेल आरोग्याला योग्य नाही. 
|| तेल जेवढे वापरावेसे वाटते, तेवढे वापरावे. 
|| लोणचे, तळलेला पापड, भजी हे पदार्थ आहारात 
|| आलेच पाहिजेत. जास्त तेल पोटात जाईल, म्हणून ते 
||  खाणे टाळू नये.

🚫 आहारातून ड जीवनसत्त्व कमी झाल्यास काय होते ?

|| शरीरात हवे असलेले फॅट मिळत नाहीत, म्हणून ड 
|| जीवनसत्व कमी होते. वेळेवर त्यावर उपाय न केल्यास 
|| हाडे दुखतात, केस गळतात, त्वचेवर डाग पडतात. 
|| मधुमेह किंवा कॅन्सर होण्यापर्यंत ही पातळी जाऊ शकते.

|| आजकाल बिझी रुटीनमुळे व्यायाम करणे अनेकांना 
|| शक्य होत नाही व्यायामाला दुसरा काही पर्याय आहे का ?

|| आजच्या युगात आपण नवीन गाडी घेतली, तरीसुद्धा ती 
|| नियमितपणे चालवतो. बाहेरगावी गेलो, तरी शेजारी 
|| किंवा नातेवाईकांना गाडी सुरू ठेवायला सांगतो. 
|| व्यायामाचेसुद्धा तसेच आहे. व्यायामाला कोणताही पर्याय 
|| नाही, तो नियमितपणे केलाच पाहिजे. अंग दुखतं, म्हणून 
|| व्यायाम करत नाही, अशी सबब अनेक जण देतात. 
|| पण खरे तर व्यायाम करत नाही, म्हणून अंग दुखतं. 
|| व्यायाम करण्यासाठी आठवड्यात फक्त १५० मिनिटे 
|| लागतात. आठवड्याच्या व्यायामाचे नीट प्लानिंग करून 
|| ते वेळापत्रक पाळले जायला हवे. व्यायाम अनेकदा 
|| उद्यावर ढकलला जातो, त्याचं योग्य नियोजन होत नाही, 
|| त्याचं गांभीर्य लोकांच्या लक्षात येत नाही.

-:♦ दोन- दोन तासाने खा, असे सांगितले जाते. :---------- 
-:♦ हे योग्य की अयोग्य ? :------------ 

|| सकाळी उठल्या उठल्या आपण चहाने सुरुवात केली, 
|| तर दिवसभराची भूक मरते आणि दिवसभराचे रुटीन 
|| बिघडते. दोन- दोन तासाने खावे. सकाळी उठून एखादं 
|| केळ खाल्लं की, आपण नंतर नीट नाश्ता करू शकतो. 
|| सकाळी नाश्त्याला डोसा, घावन, थालीपीठ असं खावं. 
|| त्यानंतर जेवणाआधी पन्हं, कोकम सरबत यासारखं पेय 
|| घेऊन त्यानंतर आपण नियमित जेवण घेऊ शकतो. 
|| जेवताना शक्यतो पाणि पिऊ नये,जेवणाच्या अर्धा तास 
|| आधी एक ग्लास पाणि प्यावे व जेवणानंतर एक तासाने 
|| पाणि प्यावे.त्यानंतर मध्ये एखाद- दुसरं फळ, संध्याकाळी 
|| चार ते सहाच्या मध्ये पुन्हा सकाळच्या नाश्त्याप्रमाणे 
|| आहार घेतला की, आपल्याला रात्री फार भूक लागत 
|| नाही. मग रात्री पेज किंवा भात खावा, म्हणजे आपल्याला 
|| शांत झोप लागू शकते.

♦ घरी केलेले चिवडा, लाडू खाण्याची योग्य वेळ कोणती ? 

|| चिवडा आणि लाडू आपण कधीही खाण्यासाठीच तयार 
|| करून ठेवतो. चिवड्यासारखी व्हर्सेटाइल गोष्ट कोणतीच 
|| नाही. चिवडा कशातही मिक्स करून खाऊ शकतो, 
|| त्यामुळे चिवडा कोणत्याही वेळी खाता येईल. 
|| लाडूसुद्धा संध्याकाळी ५-६ च्या आसपास किंवा सकाळी 
|| नाश्त्यालासुद्धा लाडू चांगला. 

👨👩 वाढत्या वयाबरोबर कसा व्यायाम करावा ? :--------- 

|| वयानुसार आपलं शरीर बदलतं, पण ते बिघडू देऊ नये. 
|| आपलं रुटीन नियमित फॉलो केलं पाहिजे. आठवड्याला 
|| १५० मिनिटे व्यायाम केला, तर ते कोणत्याही वयाला 
|| चालतं. वय वाढलं म्हणून व्यायाम कमी करण्याची गरज नाही.

💧 सकाळी उठून गरम पाणी प्यायल्याने चरबी कमी होते, 
|| असा समज आहे. यात किती तथ्य आहे. ? 

|| सकाळी उठल्यावर आवड म्हणून गरम पाणी पिण्यास 
|| काहीच हरकत नाही. पण त्यामुळे चरबी अजिबात कमी 
|| होत नाही. सकाळी उठल्यावर साधं, माठाचं किंवा गरम 
|| कोणतेही पाणी आपण पिऊ शकतो.

♦ साखरेऐवजी गूळ वापरल्याने फायदा होतो का ? ------- 

|| प्रत्येक गोष्टीचा एक विशिष्ट गुणधर्म असतो. त्यामुळे ज्या 
|| गोष्टीत साखर वापरण्याची गरज आहे, त्यात साखर 
|| वापरली पाहिजे आणि ज्या गोष्टीत गूळ वापरण्याची 
|| गरज आहे, त्यात गूळच वापरला पाहिजे. अन्यथा 
|| पदार्थाची चव बिघडते. साखर ही चांगलीच आहे. उगाच 
|| साखरेच नाव वाईट आहे. साखरेने उष्णता कमी होते, 
|| तर गुळाने उष्णता वाढते. त्यामुळे आपण पदार्थानुसार 
|| साखर किंवा गूळ वापरावा, 

🙆 केस, त्वचेसाठी काय सल्ला :------------ 

|| केस गळण्यापासून वाचण्यासाठी तसेच तजेलदार 
|| त्वचेसाठी आहारात भात, नारळ, तूप यांचा समावेश हवा. 
|| आहारामध्ये हळदीचा समावेश असण्याची गरज आहे. 
|| हळद केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे.

🌞 आपला दिवस कसा असतो ? :------------ 

|| मी ज्या शहरात असेन, त्यानुसार दिवस प्लॅन करते. 
|| ऋतूमानानुसार आणि स्थानिक पदार्थांना आहारात 
|| प्राधान्य देतेत. रोज सकाळी पोहे खाते. सध्या 
|| उन्हाळ्यामुळे कोकम आणि पन्हं घेते. जे आवडतं, तेच 
|| पदार्थ खाते. जे पदार्थ शरीराला लागतात, ते आवर्जून 
|| खाते. कारण, आपण जे खातो, तेच आपल्या चेहऱ्यावर दिसते 

🍌 फळ किंवा सुका मेव्याने दिवसाची सुरुवात करा 

🍲 नाश्त्याला पोहे, उपमा, शिरा खा :------------ 

🍷 जेवणापर्यंतच्या वेळेत सरबत घ्या :------------ 

🍎 जेवणानंतर एखादे फळ खा :----------- 

🍲 संध्याकाळी गूळ, तूप, पोळी किंवा फोडणीचा भात :--- 

😇  रात्री ८ : ३० च्या दरम्यान हलका आहार घ्या :---------- 

|| हलका आहार घेतल्याने झोप चांगली लागते आणि 
|| दुसऱ्या दिवशी व्यायाम करण्यास उत्साह राहतो.

-:♦ आहारातून उपचार :------------ 

-:♦ पुढील आजार झाल्यास त्यांच्या खाली दिलेले :-------- 
-:♦ अन्नपदार्थ खा. आजार लवकर बरे होतील :------------ 

१ } आम्लपित्त :------------ 

|| काळी मनुका, आलं, थंड दुध, आवळा, जिरे खा.

२ } मलावरोध  :------------ 

|| पेरु, पपई, चोथा / फायबरयुक्त असलेले अन्न, 
|| दुध + पाणी, कोमटपाणी, त्रिफळा चूर्ण घ्या. 
|| पोटाचे व्यायाम करा, टाँयलेटला बसल्यावर हनुवटी प्रेस 
|| करा. लवकर पोट साफ होते.

३ } हार्टअटैक / ब्लॉकेज :------------ 

|| लसूण, कांदा, आलं खा. रक्ताच्या गाठी होत नाहीत. 
|| रक्ताभिसरण उत्तम होते.

४ } डिसेन्टरी / जुलाब :------------ 

|| कापूर + गुळ एकत्र करून खा. त्यावर पाणी प्या. 
|| लगेच गुण येतो.

५ } खोकला :------------ 

|| २/३ काळीमिरी चोखा. दिवसातून तीन वेळा. 
|| खोकला थांबतो.

६ } मुळव्याध :------------ 

|| नारळाची शेंडी जाळून राख ताकातून दिवसातून २/३ 
|| वेळा घ्या. चांगला गुण येतो. रामदेव बाबांचा उपाय आहे.

७ } दारूचे व्यसन :------------ 

|| वारंवार गरम पाणी प्या. तसेच दारू पिण्याची आठवण 
|| येईल त्यावेळी जरूर गरमच पाणी प्या. २/३ महीन्यात 
|| दारू सुटेल.

८)  डोळे येणे :------------ 

|| डोळ्यांना गाईचे तुप लावा. आराम पडेल. कापूर जवळ 
|| ठेवा. संसर्ग वाढणार नाही.

९ } स्टोन :------------ 

|| पानफुटीची पाने खा. कुळीथ भाजी खा. भरपूर पाणी प्या.  

१० } तारूण्यासाठी :------------ 

|| भाज्यांचा रस, आरोग्य पेय, फळे खा. गव्हांकुराचा रस, 
|| Green Tea, प्या. 

---------------------:♦ आरोग्य संदेश ♦:--------------------- 

|| संतुलित आहारात उपचार आहेत खरे, सर्वच आजार 
|| नक्कीच होतील बरे. 

Forwarded msg

Popular posts from this blog

वाक्प्रचार व अर्थ

......॥जय शिवराय ॥.......

माहिती तंत्रज्ञान अभ्यासक्रम इयत्ता ७ वी