Posts

Showing posts from April, 2015

१ ते ७ साठी उपयुक्त माहिती

नोंदी कशा कराव्यात मराठी 1 आपले विचार ,अनुभव ,भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो 2 ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वत:च्या शब्दात सांगतो 3 बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो 4 कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो 5 प्रभावीपणे प्रकटवाचन करतो 6 मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो 7 आत्मविश्वासपूर्वक बोलतो 8 दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो 9 लक्षपूर्वक , एकाग्रतेने व समजपुर्वक मुकवाचन करतो 10 योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो 11 विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो 12 स्वत:हून प्रश्न विचारतो 13 कविता तालासुरात साभिनय म्हणतो 14 नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो 15 नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो 16 दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो 17 विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो 18 बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो 19 व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो 20 भाषण, संभाषण ,संवाद ,चर्चा एकाग्रतेने ऐकतो 21 बोधकथा, वर्तमानपत्रे , मासिके इ वाचतो व इतरांना माहिती सांगतो 22 ऐकलेल्या ,वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष काढतो 23 मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो 24 निंबध लेखनात आपल्या भाषेत विचार

लेखमाला व कविता 25

Image

लेखमाला व कविता 24

Image

लेखमाला व कविता 23

Image

लेखमाला व कविता 22

Image

लेखमाला व कविता 21

Image

लेखमाला व कविता 20

Image

लेखमाला व कविता 19

Image

लेखमाला व कविता 18

Image

लेखमाला व कविता 17

Image

लेखमाला व कविता 16

Image

लेखमाला व कविता 15

Image

लेखमाला व कविता 14

Image

लेखमाला व कविता 13

Image

लेखमाला व कविता 11

Image

लेखमाला व कविता 10

Image

लेखमाला व कविता 9

Image

लेखमाला व कविता 8

Image

लेखमाला व कविता 7

Image

लेखमाला व कविता 6

Image

लेखमाला व कविता 5

Image

लेखमाला व कविता 4

Image

लेखमाला व कविता 3

Image

लेखमाला व कविता 2

Image

लेखमाला व कविता 1

Image

फिरती शाळा एक अभिनव उपक्रम

फिरती शाळा एक अभिनव उपक्रम विद्यार्थी शाळेपर्यंत येऊ शकत नसेल तर शाळाच विद्यार्थ्यांपर्यंत जावी ही संकल्पना प्रत्यक्षात उतवारी यासाठी सोलापूर महापालिका आणि बालकामगार प्रकल्पाने पुढाकार घेतला आहे. याअंतर्गत महापालिकेच्या बसलाच शाळेत परावर्तीत करून शाळाबाह्य मुलांना शिकविण्याचा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. राज्यात सर्वप्रथम प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या या प्रयोगाची फलश्रृती झाल्यास त्याला राज्यपातळीवर चालविण्याचा मनोदय आहे. भारत सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयामार्फत सोलापूर जिल्ह्यात गेल्या 18 वर्षापासून राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प कार्यान्वित आहे. या कालावधीत प्रकल्पाने विविध धोकादायक उद्योगात काम करणाऱ्या बालकामगारांचे शैक्षणिक पुनर्वसन केले आहे. प्रकल्पाअंतर्गत आजतागायक 14,535 बालकामगारांना प्रवेश दिला व त्यातील 10,920 बालमजूर शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल झाले आहेत. सोलापूर जिल्ह्याची ही कामगिरी महाराष्ट्रात उल्लेखनीय अशीच आहे. परंतु आजही बालकामगार, शाळाबाह्य मुले आढळून येतात अशा मुलांची नावे ज्या त्या विभागातील शासनमान्य शाळेच्या पटावर आहेत. परंतु, ती शाळेत जा

धोरणे आणि योजना

राष्ट्राच्या घटनात्मक योजना  Opens a page containing information भारताच्या घटनेत राज्याच्या निती दाखविणा-या सिद्धांतांत कलम २१ ए, २४ आणि ३९ मध्ये मुलांच्या विकासासाठीची कारणे व त्याबद्दलची कर्तव्ये नमुद केली आहेत. सूचना आणि दळणवळण तांत्रिकी (ICT @ Schools)  Opens a page containing information "शाळांमध्ये सूचना आणि दळणवळण तांत्रिकी [आयसीटी]’’ ही केन्द्र प्रायोजित योजना डिसेंबर २००४ मध्ये माध्यमिक पातळीच्या विद्यार्थ्यांसाठी आयसीटी कौशल्य आणि आयसीटी सहाय्य प्राप्त प्रक्रिया शिकण्याच्या संधींचा विकास करण्यासाठी सुरू करण्यात आली. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान  Opens a page containing information राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान हा भारत सरकारचा आत्ताच सुरु करण्यात आलेला कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश माध्यमिक शिक्षणाचे सार्वत्रीकरण असा आहे (यू. एस. ई). सरकारतर्फे सुरु करण्यात आलेला देशातील लाखो मुलांना प्रारंभिक शिक्षण देणारा राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाचा हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर यशस्वी झालेला आढळतो, आणि म्हणूनच देशात ह्या कार्यक्रमाची माध्यमिक स्थरावर विस्तार करण्य

शिकवणे आणि आयसीटी

शिकवणे आणि आयसीटी शिक्षक, शिकवणे आणि आयसीटी सध्याचा माहितीसाठा आपल्याला काय माहीत आहे, आपली कशावर श्रद्धा आहे व कशावर नाही प्रशिक्षण महत्त्वाचे आहे आयसीटीमधील गुंतवणुकीमधून अधिकाधिक फायदे मिळवायचे असतील तर शिक्षक प्रशिक्षण आणि निरंतर, सुसंगत व्यावसायिक विकास आवश्यक आहे. शिक्षकाची भूमिका आयसीटी वापरणा-या शिक्षकाची भूमिका जरी समन्वयकाची होत असली तरीही त्यामुळे वर्गामध्ये नेत्याची भूमिका बजावण्यासाठी त्याची गरज नष्ट होत नाही; पारंपारिक शिक्षकाची नेतृत्व गुणकौशल्ये आणि सराव आजही आवश्यक आहेत. (खासकरून धड्याचे नियोजन, तयारी आणि मागोवा यांशी निगडीत) आयसीटी वापरताना धड्याचे नियोजन करणे खूप महत्त्वाचे आहे आयसीटी वापरत असताना शिक्षकाने धड्याचे नियोजन करणे खूप महत्त्वाचे आहे; संशोधनांती हे सिद्ध झाले आहे की जेथे नियोजन कमकुवत होते तेथे विद्यार्थांची कामगिरी बहुतेकदा दिशाहीन बनते आणि याचा परिणाम कमी उपस्थितीमध्ये होऊ शकतो. अध्यापनशास्त्र केवळ तंत्रज्ञानाचा वापर सुरू केल्याने शिकविण्याच्या आणि शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये बदल घडून येणार नाहीत. आयसीटी अस्तित्वात असणे या एका

आकारिक मूल्यमापन आकारिक मूल्यमापन :

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनान्तर्गत वर्षभरात प्रत्येक सत्रात आकारिक व् सकलित मूल्यमापन करावयाचे आहे।शासन   निर्णयात आकारिक व् संकलित मुल्यामापानाचा  भारांश  निश्चीत करुन   दिलेला आहे . आकारिक साधन तंत्रांना योग्य भारांश देण्यासाठी आणि मूल्यमापनाची प्रक्रिया वस्तुनिष्ठ स्वरुपात पार पाडण्यासाठी शिक्षकांनी आपल्या विषयांच्या अध्यायन- अध्यापनाचे  व मुल्यामापनाचे नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी मार्गदर्शक मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत . पूर्वतयारी : १ शिक्षकांनी संबंधित विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम . पाठ्यपुस्तके , हस्तपुस्तिका , / मार्गदर्शिका यांचा अभ्यास करावा . २ पाठ/ घटकनिहाय  अध्ययन- अनुभव देण्यासाठी आणि मूल्यमापन करण्यासाठी कोणकोणती साधन तंत्रे वापरायची याची निवड करावी ३ सर्वसाधारणपणे खालीलप्रमाणे साधन तंत्रांचे नियोजन करता येईल भारांश निश्चिती : १ . दैनंदिन निरीक्षण हे साधन सर्व विषयासाठी वापरणे अनिवार्य आहे; पण या साधनास गुण द्यायचे नाहीत त्यामुळी वेगळा भारांश देण्याची गरज नाही . २. निवडलेल्या उर्वरित साधनांसाठी संबंधित विषयाची उद्दिष्टे लक्षात घेऊन भारांश निश्चित करावा निवडल

ए आई मला पावसात जाउ दे

ए आई मला पावसात जाउ दे ए आई मला पावसात जाउ दे एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे मेघ कसे बघ गडगड करिती वीजा नभातुन मला खुणविती त्यांच्यासंगे अंगणात मज खूप खूप नाचु दे बदकांचा बघ थवा नाचतो बेडुक दादा हाक मारतो पाण्यामधुनी त्यांचा मजला पाठलाग करु दे धारेखाली उभा राहुनी पायाने मी उडविन पाणी ताप, खोकला, शिंका, सर्दी, वाट्टेल ते होऊ दे कवियत्री : वंदना विटणकर

नाच रे मोरा, अंब्याच्या बनात

नाच रे मोरा, अंब्याच्या बनात नाच रे मोरा, अंब्याच्या बनात नाच रे मोरा नाच ! ढगांशि वारा झुंजला रे काळाकाळा कापूस पिंजला रे आता तुझी पाळी, वीज देते टाळी फुलव पिसारा नाच ! झरझर धार झरली रे झाडांचि भिजली इरली रे पावसात न्हाऊ, काहितरि गाऊ करुन पुकारा नाच ! थेंबथेंब तळ्यात नाचती रे टपटप पानांत वाजती रे पावसाच्या रेघांत, खेळ खेळु दोघांत निळ्या सौंगड्या नाच ! पावसाचि रिमझिम थांबली रे तुझिमाझि जोडी जमली रे आभाळात छान छान, सातरंगी कमान कमानीखाली त्या नाच !

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन "हॅलो, हॅलो !" करायला छोटासा फोन ! बिस्कटांच्या गच्‍चीवर मोर छानदार पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाललाल चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो मोत्यांच्या फुलांतून लपाछपी खेळतो उंच उंच झोक्याचा खेळ रंगला मैनेचा पिंजरा वर टांगला किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला कवी : राजा मंगळवेढेकर

अरविंद गुप्ता यांच्या साईट वरून बलून रॉकेट ची फिल्म दिली आहे.

Image
रॉकेटचा फुगा (रॉकेट बलून)भलेही तुम्ही खरे खरे रॉकेट उडवू शकत नसाल पण हे बलून रॉकेट तुम्ही निश्चित उडवू शकाल त्यासाठी एक लांब रबरी फुगा आणि एक जड स्ट्रॉ घ्या फुग्याच्या एका टोकाला गाठ मारा आणि दुसर्या टोकातून जाड  स्ट्रॉ चा तुकडा घाला आणि तो सेलोटेपने चिकटवा आता तोंडाने स्ट्रॉ मधून हवा भरा. आणि हवेत सोडा. हा फुगा हवेत उंच रॉकेट सारखा आवाज करत झेपावतो

शिक्षणाचा अधिकार

शिक्षणाचा अधिकार बाल अधिकार संरक्षण राष्ट्रीय आयोग Opens a page containing information ह्या विभागामध्ये बाल अधिकार संरक्षण राष्ट्रीय आयोगाची रचना, उद्दिष्टे व कार्याबद्दल माहिती दिली आहे. बाल अधिकार Opens a page containing information सरकार, गैर सरकारी संगठना आणि इतर सर्व एकत्र आले आहेत व प्रथम भरतातील मुलांच्या काही खास प्रश्नांवर प्रकाश टाकत आहेत. त्यात मुलांबद्दल व त्यांच्या कामाबद्दलचे मुद्दे आहेत, बालमजुरीवर देखील ते काम करत आहेत, लहान मुलींवर होणारे अत्याचार व भेदभाव, रस्त्यावरील मुलांना वर आणणे, अपंग मुलांच्या गरजा समजणे, प्रत्येक बालकाला शिक्षण मिळेल हे पाहणे ही त्यांची प्रथम पटावरील कामे आहेत. बाल अधिकारांमध्ये सुधार Opens a page containing information बाल अधिकारसाठी काम करणाऱ्या विविध संस्था व त्यांची कार्ये तसेच त्यांनी केलेल्या कामामुळे कसा बदल घडून आला ह्या विषयी. बाल मजुरां बद्दल Opens a page containing information आपल्या राष्ट्रासमोर बालमजुरीचा विषय नेहमीच एक प्रश्न आहे. सरकार नेहमी हा सोडविण्यासाठी पाऊले ऊचलत असते. पण, हया प्रश्नाचा आढावा घेतल्यास असे

घामाचा पैसा

घामाचा पैसा घामाचा पैसा धन्नाशेटचा मुलगा राम अगदीच आळशी. घरांत गडगंज संपत्ती. एकुलता एक लाडाचा. काम कधी करावंच लागलं नाही. आता २१ वर्षाचा झाला. शेठजींना काळजी पडली. याचे कसे होणार साठलेला पैसा किती दिवस पुरेल. दुसरे दिवशी त्यांनी मुलाला बोलावले व म्हणाले हे बघ आज तू सकाळीच बाहेर जा. काहींतरी काम करून पैसे मिळवुन आण तरच तुला जेवायला मिळेल' मुलाला काहीच कळेना. तो बहिणीकडे गेला तिने त्याला एक रूपया दिला. शेठजींनी तो विहीरीत फेकून दिला. दुसर्‍या दिवशी आईकडून घेतला तिसर्‍या दिवशी मात्र कोणीही पैसे द्यायचे नाहीत हे उमजल्यावर स्वारी घराबाहेर पडली स्वारी घराबाहेर काम शोधायला निघाली. पण काय काम करणार ? बारा वाजे पर्यंत हिंडला. काम मिळेना. पोटात कावळे कोकलायला लागले. स्टेशनवरून एक जड बॅग घेऊन येणारा माणूस दिसला त्याला हमाल हवा होता. हा धावत पुढे गेला. 'साहेब, इकडे आणा'. ती बॅग त्याने डोक्यावर उचलली. घामाघूम झाला. साहेबांनी आठ आणे हातावर ठेवले. घरी आला. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवले. दोन दिवसाप्रमाणेच शेठजींनी ते विहीरीत फेकले हा चवताळून उठला. 'बाबा अहो तेवढे आठ आणे मिळवा

एकलव्याची गोष्ट....

एकलव्याची गोष्ट.... एकलव्याची गोष्ट.... मी एकलव्य आषाढातील पौर्णिमेस 'गुरूपौर्णिमा' म्हणतात. गुरूंच्या आशीर्वादासाठी, त्यांच्या शिकवणीसाठी तसेच गुरूंच्या प्रति निष्ठा व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. भगवान वेदव्यास हे फक्त प्रज्ञावान ऋषीच नसून एक महान वैज्ञानिक व महान शास्त्रज्ञ होते. आपल्या भारतवर्षामघ्ये 'नमोस्तुते व्यास विशालबुध्दे।' असे म्हणून, या दिवशी घरोघरी व्यासपूजा करतात. अशा व्यासांच्या असामान्य प्रतिभेने शब्दांकित झालेले महाभारत... असं म्हणतात की या जगात अशी कुठलीही घटना, कथा, वा वेदना नाही, जिचा उल्लेख महाभारतामध्ये झालेला नाही. वेदविद्या पारंगत महर्षी द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अतुलनीय ज्ञान आणि युध्दतंत्र याकरिता महर्षी द्रोणाचार्यांची ख्याती होती. एकलव्य हा एका आदिवासी पुत्र. द्रोणाचार्यांकडून धनुर्विद्या संपादन करण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती. एकलव्याच्या शब्दांत त्याची कैफियत पुढे मांडली आहे. मी एकलव्य... तो दिवस माझ्या हृदयावर कोरून ठेवला गेला आहे, ज्या दिवशी मी माझ्या गुरूंना प्रथम पाहिले. होय, गुरू द्रोणाचार्य. उत्कृष्ट शिक्षक