Posts

Showing posts from August, 2016

|| शरीराला आवश्यक खनिजं ||

कृपया खालील प्रमाणे दिलेली माहिती आयुष्यभर उपयोगी पडणार ती जतन करुन ठेवा   ●|| शरीराला आवश्यक खनिजं ||● Minerals we need... 🔺कॅल्शिअम कशात असतं? शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी. ज्वारी, राजगिरा, खरबूज, खजूर कमतरतेमुळे काय होतं? हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे कार्य काय असतं? शरीरातील सर्वात मुख्य खनिजं असून ते हाडांची मजबुती आणि शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं. 🔺लोह कशात असतं? खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक, सीताफळ, उस, बोर, मध, पपई आणि मेथी कमतरतेमुळे काय होतं? शरीरात रक्ताची कमतरता भासते. अशक्तपणा, कावीळ किंवा पोटात मुरडा येतो. कार्य काय असतं? शरीराच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक असतं. 🔺सोडिअम कशात असतं? मीठ, पाणी, बटाटा, आलं, लसूण, कांदा, मिरची, पालक, सफरचंद, कारलं कमतरतेमुळे काय होतं? रक्तदाबाशी निगडित समस्या, निद्रानाश, अंगदुखी, अपचन, मूळव्याधीसारखे आजार, मोतीबिंदू, बहिरेपणा, हात अणि पाय कडक होणे. कार्य काय असतं? शरीराला आवश्यक असणारी पाचक रसायनाची निर्मिती करतात, त्याचप्रमाणे शरीरात होणारा गॅस नष्ट होतो. 🔺आयोडिन कशात असतं? शिं

" कुस्ती खेळ - माहिती "

              *खेळाचे नाव*            *🏅कुस्ती🏅* *खेळाचा उद्देश* 👊🏻 मल्लयुध्दाचा मुख्य उद्देश *प्रतिस्पर्धास नामोहरम करणे* हा आहे. 👊🏻 त्यासाठी शरीरास योग्य त्या व्यायामाने बलवान करून त्या बलाचा युक्तीने वापर करावा लागतो. 👊🏻 मल्लयुध्दासाठी पुर्वतयारी म्हणून विविध प्रकारच्या व्यायाम साधनांचा वापर करून शरीर सुदृढ, काटक व बलवान करून आत्मविश्वास वाढविणे जरूर आहे. 👊🏻 बलसंर्वधनासाठी व्यायाम, युक्ताहार, ब्रह्मचर्य, सदाचार यांचे पालन करावे लागते. *कुस्तीच्या विविध पध्दती* 👊🏻 मल्लयुध्दाची वाढ व तिचा जागतिक प्रसार गेल्या दीड-दोन शतकांत फार झपाटयाने होऊन ते एक स्वतंत्र शस्त्रच बनत चालले आहे. 👊🏻 मल्लविद्येच्या विविध पध्दती अनेक राष्ट्रांत प्रचलित असल्या, तरी त्यांतील मूलभूत तत्त्वे सामान्यत: एकसारखीच आहे. 👊🏻 अर्वाचीन काळात प्राचीन ऑलिंपिक क्रीडासामन्यांचे पुनरूज्जीवन झाल्यामुळे व त्यातही मल्लयुध्दाला विशेष प्राधान्य दिले गेल्यामुळे मल्लविद्येला जागतीक मान्यता मानली. 👊🏻 आपापल्या राष्ट्रांतील नामांकित मल्ल म्हणून घेण्यापेक्षा आंतरराष्ट्रीय मल्ल किंबहुन जगज्जेता होण्याची ई

" भारताचा तिरंगा ध्वज संहिता नियमावली "

भारतीय राष्ट्रध्वज  २२ जुलै १९४७ रोजी,  भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या २४ दिवस आधी, अंगीकारला गेला. ध्वजाची रचना भारतीय राष्ट्रध्वजात गडद  भगवा ,  पांढरा  व  हिरवा  ह्या तीन रंगांचे  आडवे पट्टे आहेत. यामुळे या झेंड्याला पुष्कळदा तिरंगा  असेही संबोधले जाते. मधल्या पांढर्‍या रंगात निळ्या रंगाचे २४ आर्‍यांचे अशोक चक्र आहे.  मच्‍छलीपट्टणम  जवळ जन्मलेल्या  पिंगली वेंकय्या  ह्यांनी तिरंग्याची रचना केली आहे. भारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबी व उंचीचे प्रमाण ३:२ असे आहे, तसेच राष्ट्रध्वज  खादीच्या  अथवा रेशमाच्या  कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे. रचना ध्वजातील गडद  भगवा ,  पांढरा  व  हिरवा  हे तीन रंगीत पट्टे आणि त्यांचे अर्थ : अधिक माहिती : रंग, भावना ... भारताच्या राष्ट्रीय ध्वजात चार रंगाचा वापर केला गेला आहे. केशरी, पांढरा, हिरवा, आणि निळा. (त्यामुळे भारताचा राष्ट्रीय ध्वज, रंगाचाच विचार केला तर तिरंगा नसून चौरंगा आहे). २२ जुलै १९४७ रोजी घटना समितीच्या बैठकीत 'तिरंगी ध्वज' भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आला. त्या संबंधीचा ठराव  पंडित जवाहरलाल