Posts

Showing posts from July, 2018

*शाळा व्यवस्थापन समिती गठन*

* शाळा व्यवस्थापन समिती गठन * स्थानिक स्वराज्य संस्था,/शासकीय व अनुदानित शाळांमध्ये समितीची स्थापना. समितीचा कार्यकाल २ वर्ष,२ वर्षानंतर पुनर्रचना. मुख्याधापक / केंद्रप्रमुख यांनी शाळा व व्यवस्थापन समितीची रचना / पुनर्रचना करण्यापूर्वी पालकसभेत समितीविषयक सर्व माहिती देणे आवश्यक. समितीची रचना राजकीय / सामाजिक दबावाखाली न करता पालकसभेत खेळीमेळीच्या वातावरणात व कायद्यातील / नियमावलीतील तरतुदीच्या आधारे करावी. * शाळा व्यवस्थापन समिती रचना * ७५% सदस्य बालकांचे माता,पिता किंवा पालक उर्वरित २५ % सदस्यांमध्ये मुख्याध्यापक आसमितीची णि ग्रामपंचायत / म.न.पा.सदस्य,शिक्षक,शिक्षणतज्ञ किंवा बालविकासतज्ञ यामधून निवड केलेल्यांचा समावेश. किमान ५०% सदस्य महिला. स्वीकृत सदस्य म्हणून शाळेतील २ विद्यार्थ्यांची निवड ( किमान १ मुलगी असावी.) पालक सद्स्यामधून अध्यक्षाची निवड करण्यातयेइल. शाळेचे मुख्याध्यापक समितीचे पदसिद्ध सचिव असतील. विशेष गरजा असणा-या बालकांचे आणि दुर्बल घटकातील माता,पिता किंवा पालक यांना प्रतिनिधित्व. * शाळा व्यवस्थापन समिती जबाबदा-या व कार्य * शाळेच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.