Posts

Showing posts from July, 2017

"प्रगत चाचण्या 2017-18 शासन निर्णय समजून घेऊया"

*"प्रगत चाचण्या 2017-18 शासन निर्णय समजून घेऊया"* ✍🏻 💧वर्षभरात 3 चाचण्यांचे आयोजन. 💧पायाभूत चाचणी ( मूलभूत क्षमता व मागील इत्तेपर्यंतच्या क्षमता) 💧संकलित चाचणी 1 (मूलभूत क्षमता व प्रथमसत्र क्षमता ) 💧संकलित चाचणी 2 ( मूलभूत क्षमता,प्रथमसत्रातील काही क्षमता,व द्वितीय सत्रातील क्षमता) ➡ *चाचणी विषय व वर्ग* 💧पहिली व दुसरी - *प्रथम भाषा, गणित.* 💧तिसरा ते पाचवा - *प्रथम भाषा, गणित व इंग्रजी.* 💧 सहावी ते आठवी - *प्रथम भाषा, गणित,इंग्रजी व  विज्ञान* ➡  *मूलभूत क्षमता* भाषा -वाचन व लेखन गणित-संख्या ज्ञान (ऐकून संख्या लिहिणे,संख्याची तुलना,विस्तारित रूप,स्थानिक किंमत) संख्येवरील क्रिया बेरीज,वजाबाकी,भागाकार,गुणाकार. ➡ *प्रगत विद्यार्थी*- 💧मूलभूत क्षमतेमध्ये 75% किंवा जास्त संपादणूक. 💧60 % किंवा जास्त गुण घेणारे. ➡ *प्रगत शाळा कोणत्या शाळेस म्हणायचे*       शाळेतील प्रत्येक विदयार्थ्यास मूलभूत क्षमतेत किमान 75%  व प्रगत चाचण्यात 60 % पेक्षा जास्त गुण. ➡ *शिक्षक/मु अ भूमिका* 💧60%पेक्षा कमी गुण विद्यार्थी यादी करणे. 💧निर्देशित अँप द्वारे सरल प्रणालीत गुणांची

संत सावता माळी

संत सावता माळी यांचा जन्म  सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरच्या जवळ  अरणभेंडी या गावात शके 1152 मध्ये झाला. त्यांच्यामुळे अरणभेंडी हे क्षेत्र झाले. अरणभेंडी येथे ज्या मळ्यात सावता माळी भाज्या पिकवता पिकवता विठ्ठलभक्ती करत, त्या मळ्यातच  विठ्ठलाला  पाहत. त्यांनी त्यांचा देहदेखील त्या मळ्यातच विठ्ठलाचे नाम घेत ठेवला. त्या ठिकाणी समाधिमंदिर बांधण्यात आले आहे. पंढरपूरला जाताना भक्तमंडळी आवर्जून अरणभेंडी येथे थांबतात आणि सावता महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतात. संत सावता माळी यांनी त्यांच्या अभंगांमधून आणि जगण्यामधून कर्म हाच ईश्वर हा संदेश महाराष्ट्राला दिला. संत सावता माळी यांनी हे सांगितले, की परमेश्वराची आराधना करताना भाव महत्त्वाचा असतो. मूर्तिपूजा आणि कर्मकांड यांपेक्षा भक्तिभाव हा खरा. त्यांनी मानवता धर्म हा महत्त्वाचा मानला. सावता माळी यांनी त्यांचा ‘माळ्या’चा धर्म आचरत, शेती करत करत परमेश्वराची आराधना केली. शेतात भरपूर कष्ट करावेत, लोकांना खरा मानवता धर्म समाजावून सांगावा. त्यांच्या मनातील अंधश्रद्धांचे तण उपटून काढून समाजमनाची मशागत करावी, समाजात जागृती करावी या हेतूने सावता माळी अभंग

" जनरल रजिस्टरमध्ये नवीन पध्दतीने नोंद अशी करा."

शालेय शिक्षण  विभाग जुने जनरल रजिस्टरमध्ये लिहा ◀शासन निर्णय दि.१९/०९/२०१६ नुसार दाखला(L.C.) व जनरल रजिस्टर  नमुना बदल शासन निर्णयाची अमलबजावणी संपुर्ण राज्यात , जिल्ह्यात व  तालुक्यात एकसुत्रता येण्यासाठी ... सद्ध्या वापरात असलेले जनरल रजिस्टर आपण बंद करुन शैक्षणिक वर्ष २०१७-२०१८ पासुन सुधारीत नमुन्यातील रजिस्टर सुरु करत आहोत त्यासाठी आपल्या सद्ध्याच्या जनरल रजिस्टरच्या शेवटच्या नोंदीखाली पुढिलप्रमाणे शेरा लिहित आहे. "" शासन निर्णय १९/०९/२०१६ सुधारीत दाखला आदेशानुसार या रजिस्टरमधील शेवटची नोंद क्र -----------------असुन याठीकाणी हे रजिस्टर नोंदीसाठी बंद करण्यात येत आहे . यापुढील नोंदी नवीन नमुन्यानुसार जनरल रजिस्टर बुक क्र. ------------ मध्ये करण्यात येतील . ""                                  मुख्याध्यापक सही                                         व शिक्का नवीन रजिस्टरच्या प्रारंभी लिहा "या रजिस्टरमध्ये  पान न.... ते ..... पान न ...... अशी एकुण .... पृष्टे आहेत ...जनरल  रजिस्टर क्र .... पासुन नोंदी या मध्ये नोंदवण्यात येतील." असे प्रमाणित करण्या