Posts

Showing posts from February, 2017

खो-खो - एक भारतीय मैदानी खेळ - नियम व इतिहास

खो-खो  हा एक  भारतीय मैदानी खेळ  आहे. ह्या खेळासाठी मैदानाच्या दोन टोकांना रोवलेले खांब सोडल्यास कोणत्याही साधनांची आवश्यकता नाही. हा खेळ खेळण्यास अतिशय सोपा आहे, तरीही हा खेळ गतिमान असल्यामुळे ह्या खेळात चपळतेचा, गतीचा कस लागतो व हा खेळ उत्कंठावर्धक होतो.खो खो हा पाठशिवणी ह्या प्रकारातला खेळ आहे. हा खेळ प्रत्येकी १२ खेळाडू असलेल्या दोन संघात खेळतात. मैदानात मात्र प्रत्येक संघाचे ९च् खेळाडू उतरतात. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना आपल्याला शिवू न देणे असा यात मुख्य प्रयत्न असतो. भारतीय उपखंडातले दोन पारंपारिक आणि लोकप्रिय पाठशिवणी खेळ म्हणजे खो खो व कब्बड्डी.दक्षिण आशिया (मुख्यत: भारत व पाकिस्तान) सोडून हा खेळ दक्षिण आफ्रिकेतही खेळला जातो. इतिहास खो-खोची सुरुवात नेमकी कधी झाली हे कळणे कठीण आहे. ह्या खेळाचा उगम महाराष्ट्रात झाला. पकडापकडीच्या खेळातून उत्क्रांती होत ह्या खेळाचा जन्म झाला असावा. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ह्या खेळात सुसूत्रता आणण्यास सुरुवात झाली. १९१४ साली पुणे जिमखाना येथे खो-खोचे नियम बनवण्यासाठी एका समितीची स्थापना झाली. १९२४ साली बडोदा जिमखान्याने खो-खोची नियमावली

महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या

महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या, नाले, ओढे आणि ओहोळ याप्रमाणे आहेत : अकोला जिल्हा    :  अडोळ नदी ,  आस नदी ,  उत्तवली नदी ,  उमा नदी ,  काटेपूर्णा नदी ,  कास नदी ,  कुप्ती नदी ,  गांधारी नदी ,  गौतमी नदी ,  चंद्रभागा नदी ,  तापी नदी ,  नागझरी नदी ,  निर्गुणा नदी ,  पठार नदी ,  पूर्णा नदी ,  पेढी नदी ,  पैनगंगा नदी ,  बोर्डी नदी ,  भुईकंद नदी ,  मन नदी ,  मून नदी ,  मोर्णा नदी ,  म्हैस नदी ,  वान नदी ,  विद्रूपा नदी ,  विश्वामित्री नदी ,  शहानूर नदी अमरावती जिल्हा  :  आरणा नदी ,  उमा नदी ,  काटेपूर्णा नदी ,  कापरा नदी  ( खापरा नदी ),  गाडगा नदी ,  खंडू नदी ,  खोलाट नदी ,  चंद्रभागा नदी ,  चुडामण नदी ,  तापी नदी ,  तिगरी नदी ,  निरगुडा नदी ,  पूर्णा नदी ,  पेंढी नदी ,  बुरशी नदी ,  भावखुरी नदी ,  भुलेश्वरी नदी ,  वर्धा नदी ,  वान नदी ,  शहानूर नदी ,  सिपना नदी ,  सुरखी नदी , अहमदनगर जिल्हा  :  आढळा नदी ,  कडा ,  कडी ,  कांबळी ,  केरी ,  केळी ,  कुकडी नदी ,  कौतिकी ,  गोदावरी नदी ,  घोडनदी नदी ,  ढोरा नदी ,  प्रवरा नदी ,  बोकडी ,  भीमा नदी ,  मुळा नदी ,  मेहेकरी ,  सीना नदी ,  हंगा नदी