......॥जय शिवराय ॥.......


देशासाठी पर्वा न केली तनाची ,
आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची ॥धृ॥
जिद्दीने लढला तो शिवराणा,
वै-याला दाखवला खंबीरपणा ,
बोटे तोडली त्याने शायिस्तेखानाची .
आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची ॥१॥
पहार वाकवी अफजलखान ,
पैजेला उचलून दरबारी पान .
बाजी लावलीया जीवानं ,
प्रतापगडच्या रानाची .
आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची ॥२॥
आधी लग्न कोंढाण्याच,
मगच माझ्या रायबाचं .
लढता लढता अमर झाला
त्या तानासारख्या सिंहाची
आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची ॥३॥
आशिर्वाद त्या माऊलीचा ,
पुत्र शोभे जिजाउचा ,
स्वराज्य रक्षण्या पुन्हा
घेउनी ये तलवार शिवाई देवीची
आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची ॥४॥
देशासाठी पर्वा न केली तनाची ,
आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची ॥धृ॥
.   . .  :- संजय वसंत जगताप
जि.प.शाळा अहिरवडे ता.मावळ जि पुणे  ९७६२१८१७०६

Popular posts from this blog

माहिती तंत्रज्ञान अभ्यासक्रम इयत्ता ७ वी

वाक्प्रचार व अर्थ