वाक्प्रचार व अर्थ

*वाक्यप्रचार*
**वाक्प्रचार*

*सर्वस्व पणाला लावणे* - सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे
*साखर पेरणे* - गोड गोड बोलून आपलेसे करणे
*सामोरे जाणे * - निधड्या छातीने संकटास तोंड देणे
*साक्षर होणे* - लिहिता-वाचता येणे
*साक्षात्कार होणे* - आत्मिक ज्ञान प्राप्त होणे खरेखुरे स्वरूप कळणे
*सुताने स्वर्ग गाठणे* - थोडा सुगावा लागताच संपूर्ण गोष्टीचे स्वरूप तर्काने जाणण्याचा प्रयत्न करणे े
*सोन्याचे दिवस येणे* - अतिशय चांगले दिवस येणे
*सूतोवाच करणे* - पुढे घडणार्‍या गोष्टींची प्रस्तावना करणे
*संधान बांधणे* - जवळीक निर्माण करणे
*संभ्रमात पडणे* गोंधळात पाडणे
*स्वप्न भंगणे* - मनातील विचार कृतीत न येणे
*स्वर्ग दोन बोटे उरणे* - आनंदाने गर्वाने अतिशय फुगून जाणे
*हट्टाला पेटणे* - मुळीच हट्ट न सोडणे
*हमरीतुमरीवर येणे* - जोराने भांडू लागणे
*हरभऱ्याच्या झाडावर चढणे* - खोटी स्तुती करून मोठेपणा देणे
*हसता हसता पुरेवाट होणे* अनावर हसू येणे
*हस्तगत करणे* - ताब्यात घेणे
*हातपाय गळणे* - धीर सुटणे
*हातचा मळ असणे* सहजशक्य असणे
*हात ओला होणे* - फायदा होणे
*हात टेकणे* - नाइलाज झाल्याने माघार घेणे
हात देणे मदत करणे
*हात मारणे ताव मारणे* -  भरपूर खाणे
*हाय खाणे* - धास्ती घेणे
*हात चोळणे* - चरफडणे
*हातावर तुरी देणे* - डोळ्यांदेखत फसवून निसटून जाणे
*हात हलवत परत येणे* - काम न होता परत येणे
*हात झाडून मोकळे होणे* - जबाबदारी अंगावर टाकले की व जबाबदारी टाकून टाकून मोकळे होणे
*हाता पाया पडणे* गयावया करणे
*हातात कंकण बांधणे* - प्रतिज्ञा करणे
*हाताला हात लावणे* - थोडीदेखील मेहनत न घेता फुकटचे श्रेय घेणे
* तळहातावर शीर घेणे* - जिवावर उदार होऊन किंवा प्राणांचीही पर्वा न करणे
*हात धुवून पाठीस लागणे* - चिकाटीने एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे
*हूल देणे* - चकवणे
*पोटात ब्रह्मराक्षस उठणे* - खूप खावेसे वाटणे
*प्रश्नांची सरबत्ती करणे* - एक सारखे प्रश्न विचारणे
*प्राण कानात गोळा करणे* - ऐकण्यासाठी अतिशय उत्सुक होणे
*प्राणावर उदार होणे* - जिवाची पर्वा न करणे
*फाटे फोडणे* - उगाच अडचणी निर्माण करणे
*फुटाण्यासारखे उडणे* - झटकन राग येणेवाक्प्रचार
*बट्ट्याबोळ होणे* विचका होणे
*बभ्रा करणे* - बोभाटा करणे सगळीकडे प्रसिद्ध करणे
*बारा वाजणे* - पूर्ण नाश होणे
*बादरायण संबंध असणे* ओढून ताणून लावलेला संबंध असणे
*बत्तीशी रंगवणे* - जोराने थोबाडीत मारणे
*बुचकळ्यात पडणे* - गोंधळून जाणे
*बेत हाणून पाडणे* - बेत सिद्धीला जाऊ न देणे
 *बोचणी लागणे* एखादी गोष्ट मनाला लागून राहते
*बोटावर नाचवणे* - आपल्या इच्छेप्रमाणे दुसऱ्याला वागायला लावणे
*बोल लावणे* - दोष देणे
*बोळ्याने दूध पिणे* - बुद्धिहीन असणे
*बोलाफुलाला गाठ पडणे* - दोन गोष्टींची सहजासहजी एक वेळ जमून येणे
*भगीरथ प्रयत्न करणे*  - चिकाटीने प्रयत्न करणे
*भान नसणे* - जाणीव नसणे
*भारून टाकणे* - पूर्णपणे मोहून टाकणे
*मनात मांडे खाणे* - व्यर्थ मनोराज्य करणे
*माशा मारणे* - कोणताही उद्योग न करणे
*मिशीवर ताव मारणे * बढाई मारणे
*दोघांच्या मधून विस्तव न जाणे* - अतिशय वैर असणे
*मूग गिळणे* - उत्तर न देता गप्प राहणे
*मधाचे बोट लावणे* - आशा दाखवणे
*मनात घर करणे* - मनात कायमचे राहणे
*मन मोकळे करणे* - सुखदुःखाच्या गोष्टी बोलून दाखविणे
*मनाने घेणे* - मनात पक्का विचार येणे
*मन सांशक होणे* - मनात संशय वाटू लागणे
*मनावर ठसण* - मनावर जोरदारपणे बिंबणे
*मशागत करणे* - मेहनत करून निगा राखणे
*मात्रा चालणे* - योग्य परिणाम होणे
*रक्ताचे पाणी करणे* - अतिशय मेहनत करणे
*राईचा पर्वत करणे * - शुल्लक गोष्टीला उगाच मोठे स्वरूप देणे
*राख होणे* - पूर्णपणे नष्ट होणे
*राब राब राबणे* - सतत खूप मेहनत करणे
*राम नसणे* - अर्थ नसणे
*राम म्हणणे* - शेवट होणे मृत्यू येणे
*लष्कराच्या भाकर्‍या भाजणे* - दुसऱ्यांच्या उठाठेवी करणे
*लहान तोंडी मोठा घास घेणे* - आपणास न शोभेल अशाप्रकारे वरचढपणा दाखवणे
*लक्ष वेधून घेणे* - लक्ष ओढून घेणे
*लक्ष्मीचा वरदहस्त असणे* - लक्ष्मीची कृपा असणे श्रीमंती असणे
*लौकिक मिळवणे* - सर्वत्र मान मिळवणे
*वकील पत्र घेणे* - एखाद्याची बाजू घेणे
*वाट लावणे* *विल्हेवाट लावणे* मोडून तोडून टाकणे
*वाटाण्याच्या अक्षता लावणे* - स्पष्टपणे नाकारले
वठणीवर आणणे ताळ्यावर आणणेे
*वणवण भटकणे* - एखादी गोष्ट मिळविण्यासाठी खूप फिरणे
*वाचा बसणे* - एक शब्द येईल बोलता न येणे
*विचलित होणे* - मनाची चलबिचल होणे
*विसंवाद असणे* - एकमेकांशी न जमणे
*वड्याचे तेल वांग्यावर काढणे* - एकाचा राग दुस-यावर काढणे
*विडा उचलणे* - निश्चय किंवा प्रतिज्ञा करणे
*वेड घेऊन पेडगावला जाणे* - मुद्दाम ढोंग करणे
*शब्द जमिनीवर पडू न देणे* - दुसऱ्याच्या इच्छेनुसार लगेच कार्यवाही करणे
*शहानिशा करणे* - एखाद्या गोष्टीबाबत चौकशी करून खात्री करून घेणे
*शिगेला पोचणे* - शेवटच्या टोकाला जाणे
*शंभर वर्ष भरणे* - नाश होण्याची वेळी घेणे
*श्रीगणेशा करणे* - आरंभ करणे
*सहीसलामत सुटणे* - दोष न येता सुटका होणे
*दगा देणे* - फसवणे
*दबा धरून बसणे*  - टपून बसणेे
*दाद मागणे* - तक्रार करून किंवा गार्‍हाणे सांगून न्याय मागणे
*दात धरणे* - वैर बाळगणे
*दाढी कुरवाळणे*  - विनवणी करणे
*दगडावरची रेघ* - खोटे न ठरणारे शब्द
*दातांच्या कण्या करणे* - अनेक वेळा विनंती करून सांगणे
*दाती तृण धरणे * - शरणागती पत्करणे
*दत्त म्हणून उभे राहणे* - एकाएकी हजर होणे
*दातखिळी बसणे* - बोलणे अवघड होणे
*द्राविडी प्राणायाम करणे* - सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे
*दात ओठ खाणे* - द्वेषाची भावना दाखवणे
*दोन हातांचे चार हात होणे* - विवाह होणे
*दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे* - दुसऱ्याच्या तंत्राने किंवा सल्ल्याने चालणे
*दातास दात लावून बसणे* - काही न खातो उपाशी राहणे
*दुःखावर डागण्या देणे* - दुःखी  माणसाला वाईट वाटेल असे बोलून आणखी दुःख देणे धरणे धरणे हट्ट धरून बसणे
*धारातीर्थी पडणे* - रणांगणावर मृत्यू येणे
*धाबे दणाणणे* - खूप घाबरणेे
*धूम ठोकणे* - वेगाने पळून जाणे
*धूळ चारणे* - पूर्ण पराभव करणे
*नजरेत भरणे* - उठून दिसणे
*नजर करणे* भेटवस्तू देणे े
*नाक घासणे*  स्वतःची कार्य साधण्यासाठी दुसर्‍याचे पाय धरणे
*नाक ठेचणे* - नक्शा उतरवणे
*नाक मुरडणे* - नापसंती दाखवणे
*नाकावर राग असणे * - लवकर चिडणे
*नाकाला मिरच्या झोंबणे* -  एखाद्याचे वर्म काढल्यामुळे त्याला राग येणे
*नाकी नऊ येणे* - मेटाकुटीला येणे फार त्रास होणे
*नांगी टाकणे* - हातपाय गाळणे
*नाकाने कांदे सोलणे* - स्वतःचे दोष असूनही उगाच बढाया मारणे
*नक्राश्रू ढाळणे* - अंतर्यामी आनंद होत असताना बाह्यतः दुःख दाखवणे
*नक्शा उतरवणे* - गर्व उतरवणे
*नाकाशी सूत धरणे* - आता मरतो की घटकेने मरतो अशी स्थिती निर्माण होणे
*पाठीशी घालणे * संरक्षण देणे
*पाणी पडणे*  - वाया जाणे
*पाणी मुरणे* - कपटाने काहीतरी लपवून ठेवणे गुप्त कट शिजवत असणे
*पाणी पाजणे* - पराभव करणे
*पाणी सोडणे* - आशा सोडणे
*पदरात घेणे* - स्वीकारणे
*पदरात घालणे * - सुख पटवून देणे स्वाधीन करणे
*पाचवीला पुजणे* - त्रासदायक गोष्टींची कायमची सोबत असणे
*पाठ न सोडणे* - एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरवणे
*पाढा वाचणे* - सविस्तर हकीकत सांगणे
*पादाक्रांत करणे* - जिंकणे
*पार पाडणे* पूर्ण करणे
*काळ्या दगडावरची रेघ* - खोटे न ठरणारे शब्द
*मिशांना तूप लावणे* - उगीच ऐट दाखवणे
*Yogakshema चालविणे* - रक्षणाची काळजी वाहणे *जीवाची मुंबई करणे* -  अतिशय चैनबाजी करणे
*अंगाला होणे* -, अंगाला छान बसणे
*अंगी ताठा भरणे* - मग्रुरी करणे े
*पोटात ठेवणे* - गुप्तता ठेवणे
*अठरा गुणांचा खंडोबा* -  लबाड माणूस
*धारवाडी काटा* - बिनचूक वजनाचा काटा
*जीवाची मुंबई करणे* - अतिशय चैनबाजी करणे
*डोळे लावून बसणे* - खूप वाट पाहणे
*कुणकुण लागणे* -  चाहूल लागणे
*कच्छपी लागणे* -, नादी लागणे
*धिंडवडे निघणे* - फजिती होणे
*बाजार गप्पा* - निंदानालस्ती
*अंगावर काटा येणे* भीती वाटणे
*जीव वरखाली होणे* घाबरणे
*उसंत मिळणे* - वेळ मिळणे
*चितपट करणे* - कुस्ती हरविणे
*फटफटती सकाळ होणे* पोटात कावळे ओरडत भुकेने व्याकूळ होणे
*डोळे वटारणे* - रागाने बघणे
*दक्षता घेणे* काळजी घेणे
*साशंक होणे* शंका येणे
*ज्याचे नाव ते*  - उपमा देण्यात उदाहरण नसणे
*भानावर येणे* - परिस्थितीची जाणीव होणे शुद्धीवर येणे
*निक्षून सांगणे* - स्पष्टपणे सांगणे
*वाचा बंद होणे* - तोंडातून एक शब्दही बाहेर न पडणे
*तोंड भरून बोलणे* - खूप स्तुती करणे
*गाजावाजा करणे* - खूप प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करणे
*नूर पातळ होणे* - रूप उतरणे
*उसने बळ आणणे* - खोटी शक्ती दाखविणे
*उताणा पडणे* - पराभूत होणे
*खितपत पडणे* - क्षीण होत जाणे
*भाऊबंदकी असणे* - नात्यात भांडण असणे
*सांजावने* संध्याकाळ होणे
*कात्रीत सापडणे* दोन्ही बाजूंनी संकटात सापडले
*भंडावून सोडले* त्रास देणे
*खायचे वांदे होणे* उपासमार होणे खायला न मिळणे
*तगादा लावणे* पुन्हा पुन्हा मागणी करणे
*पडाव पडणे* वस्ती करणे
*चाहूल लागणे* एखाद्याचे अस्तित्व जाणवणे
*लष्टक लावणे झंझट लावणे* -  निकड लावणे
*ऊहापोह करणे* - सर्व बाजूंनी चर्चा करून साधकबाधक विचार करणे
*पाळत ठेवणे* - लक्ष ठेवणे
*अनभिज्ञ असणे * - एखाद्या विषयाचे मुळीच ज्ञान असणे
*कूच करणे * - वाटचाल करणे
*संभ्रमित होणे* गोंधळणे
*विदीर्ण होणे* - भग्न होणे मोडतोड होणे
*साद घालणे मनातल्या मनात दुःख करणे
*वेसण घालणे* :-   मर्यादा घालने
*बारा गावचे पाणी पिणे * - विविध प्रकारचे अनुभव घेणे
*मिनतवारी करणे* - दादा पुता करणे
*गाजावाजा करने* - प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करणे
*उसने बळ आणणे* - खोटी शक्ती दाखविणे
*उताणे पडणे* पराभूत होणे
*कानशिलं ची भाजी होणे* - मारून मारून कानशिलांच्या आकार बदलणे
*हीच काय दाखविणे* - बळ दाखवून किंमत लक्षात आणून देणे
*दातखिळी बसणे* - बोलती बंद होणे
*नाक मुठीत धरणे* - अगतिक होणे
*काळीज उडणे* - भीती वाटणे
*नसती बिलामत येणे* - नसती कटकट ओढणे
पिंक टाकणे थुंकणे
* सख्य नसणे* - प्रेमळ नाते नसणे े
*चित्त विचलित होणे* - मूळ विषयाकडे लक्ष दुसरीकडे जाणे
*आंदण देणे* - देऊन टाकणे
*मनोरथ पूर्ण होणे* - इच्छा पूर्ण होणे
*पुनरुज्जीवन करणे* - पुन्हा उपयोगात आणणे
*निष्प्रभ करणे* - महत्व कमी करणे
*अट्टहास करणे* - आग्रह धरणे
*बळ लावणे* - शक्ती खर्च करणे
*हुडहुडी भरणे* - थंडी भरणे
*उच्छाद मांडणे * - धिंगाना घालने
*सही ठोकणे* - निश्चित करणे
*माशी शिंकणे* - अडथळा येणे
*पाचवीला पुजणे* एखादी गोष्ट जन्मापासून असणे
*तजवीज करणे* तरतूद करणे
*प्रतिबंध करणे* - अटकाव करणे
*जळफळाट होणे* - रागाने लाल होणे
*डोक्यावर घेणे* - अति लाड करणे
*देणे-घेणे नसणे* - संबंध नसणे
*बस्तान ठोकणे* - मुक्काम ठोकणे
*आभाळाला कवेत घेणे* - मोठे काम साध्य करणे
*आतल्या आत कुढणे*  - मनातल्या मनात दुःख करणे
.*पाण्यात पाहणे* - अत्यंत द्वेष करणे
*पराचा कावळा करणे* मामुली गोष्टीला भलतेच महत्त्व देणे
*पाऊल वाकडे पडणे* वाईट मार्गाने जाणे
*पायाखाली घालणे* पादाक्रांत करणे
*पुंडाई करणे* दांडगाईने वागणे
*पाठ दाखवणे* पळून जाणे
*पायमल्ली करणे* उपमर्द करणे
*पोटात कावळे काव काव करणे* अतिशय भूक लागणे
*पोटात घालणे* क्षमा करणे
*पोटात शिरणे* मर्जी संपादन करणे
*पोटावर पाय देणे* उदर निर्वाहाचे साधन काढून
*पोटाची दमडी  वळणे* खायला न मिळणे
*पदरमोड करणे* दुसऱ्यासाठी स्वतःचा पैसा खर्च करणे
*पोटाला चिमटा घेणे* पोटाला न खाता राहणे
*चौदावे रत्न दाखवणे* मार देणे
*जमीनदोस्त होणे* पूर्णपणे नष्ट होणे
*जंग जंग पछाडणे* निरनिराळ्या रीतींनी प्रयत्न करणे कमालीचा प्रयत्न करणे
*जिभेला हाड नसणे* वाटेल ते बेजबाबदार पणे बोलणे जिवात जिव येणे काळजी नाहीशी होऊन पुन्हा धैर्य येणे
*जीव भांड्यात पडणे* काळजी दूर होणे
जीव मुठीत  धरणे* मन घट्ट करणे
*जीव मेटाकुटीस येणे* त्रासाने अगदी कंटाळून झाली
*जीव अधीर होणे* उतावीळ होणे
*जीव टांगणीला लागणे* चिंताग्रस्त होणे
*जीवावर उदार होणे* प्राण देण्यास तयार होणे
*जिवाचे रान करणे* खूप कष्ट सोसणे
*जीव खाली पडणे* काळजी मुक्त होणे
*धडा करणे जिवाच्या धडा करणे* पक्का निश्चय करणे
*जीव की प्राण असणे* प्राणाइतके प्रिय असणे
*जिवावर उठणे* जीव घेण्यास उद्युक्त होणे
*जीवावर उड्या मारणे* दुसऱ्यावर अवलंबून राहून चैन करणे
*जीवाला घोर लागणे* खूप काळजी वाटणे
*जीव गहाण ठेवणे* कोणत्याही त्यागास तयार असणे
*जिव थोडा थोडा होणे* अतिशय काळजी वाटणे
*जोपासना करणे( काळजीपूर्वक संगोपन करणे
*झाकले माणिक* साधा पण गुणी मनुष्य
*झळ लागणे* थोडाफार दुष्परिणाम भोगावा लागणे
*टक लावून पाहणे* एकसारखे रोखून पाहणे
*टाहो फोडणे* मोठ्याने आकांत करणे
*टाके ढीले होणे* अतोनात श्रम झाल्यामुळे अंगी ताकत न रहाणे
*टेंभा मिरविणे* दिमाख दाखवणे
*डाव साधणे* संधीचा फायदा घेऊन कार्य साधने योजलेल्या युक्तीने इष्ट वस्तू मिळविणे
*डाळ शिजणे थारामानी मिळणे आणि सोया जुळणे* मनाजोगे काम होणे
*डांगोरा पिटणे* जाहीर वाच्यता करणे
*डोक्यावर मिरी वाटणे* वरचढ होणे
*डोके खाजविणे* एखाद्या गोष्टीचा विचार करणे
*डोक्यावर खापर फोडणे* एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे
*डोळ्यात धूळ फेकणे* फसवणूक करणे
*डोळ्यांवर कातडे ओढणे* जाणून बुजून दुर्लक्ष करणे
*डोळा चुकवणे* अपराधी भावनेमुळे नजरेला नजर देणं टाळणे
*डोळे निवणे* समाधान होणे
*डोळ्यांत खुपणे* सहन न होणे
*डोळ्यांचे पारणे फिटणे* पूर्ण समाधान होणे
*डोळे खिळून राहणे* एखाद्या गोष्टीकडे सारखे बघत राहणे
*डोळे दिपवले* थक्क करून सोडले
*डोळ्यात प्राण आणणे* एखाद्या गोष्टीसाठी अतिशय आतुर होणे
*डोळे फाडून पहाणे* तीक्ष्ण नजरेने पाहणे आश्चर्यचकित होऊन पाहणे
*डोळ्यात तेल घालून रहाणे* अतिशय जागृत रहाणे
*डोळे भरून पहाणे* समाधान होईपर्यंत पाहाने
तडीस नेणे पूर्ण करणे
*ताळ्यावर आणणे* योग्य समज देणे
*तळपायाची आग मस्तकात जाणे* अतिशय संताप होणे
*तारांबळ उडणे* अतिशय घाई होणे
*तिलांजली देणे* सोडणे त्याग करणे
*तोंड काळे करणे* दृष्टीआड होणे नाहीसे होणे
*तोंडाला पाने पुसणे* फसवणे
*तळहातावर शीर घेणे* जीवावर उदार होणे
*तोंडचे पाणी पळणे* अतिशय घाबरले भयभयीत होणे
*तोंडाला पाणी सुटणे* लालसा उत्पन्न होणे
*त्राटिका* कजाग बायको
*तोंडात बोट घालणे* आश्चर्यचकित होणे
*तोंड टाकणे* बोलणे
*तोंडावाटे ब्र न काढणे* एकही शब्द न उच्चारणे
*थांगपत्ता  न लागणे* कल्पना न येणे
*थुंकी झेलणे* खुशामत करण्यासाठी लाचारी पत्करणे
*उष्टे हाताने कावळा न हाकण* कधी कोणाला यत्किंचितही मदत न करणे
*एक घाव दोन तुकडे करणे* ताबडतोब निर्णय घेऊन गोष्ट निकालात काढणे
*अंगावर काटे उभे राहणे* भीतीने अंगावर शहारे येणे
*अंगावर मूठभर मांस चढणे* धन्यता वाटणे
*अंगाचा तिळपापड होणे* अतिशय संताप येणे
*अंथरूण पाहून पाय पसरणे* एपती नुसार खर्च करणे
*कणिक तिंबणे* खूप मार देणे
*कपाळ फुटणे * दुर्दैव ओढवणे
*कपाळमोक्ष होणे* मरण पावणे
*कान फुंकणे* दुसऱ्याच्या मनात किल्मिष निर्माण करणे
*कागदी घोडे नाचवणे* लेखनात शूरपणा दाखविणे
*कानावर हात ठेवणे* माहीत नसल्याचा बहाणा करणे
*कानउघाडणी करणे * शब्दात चूक दाखवून देणे
य*काखा वर करणे* आपल्याजवळ काही नाही असे दाखवणे
*कानाडोळा करणे* दुर्लक्ष करणे
*कायापालट होणे* स्वरूप पूर्णपणे बदलणे
*काट्याने काटा काढणे* शत्रूच्या सहाय्याने दुसर्‍या शत्रूचा पराभव करणे
*काट्याचा नायटा होणे* शुल्लक गोष्टीचा भयंकर परिणाम होणे
*कावरा बावरा होणे* बावरने,गोंधळून घाबरणे. 
*काळजाचे पाणी पाणी होणे* अति दुःखाने मन विदिर्ण होणे
*कुत्रा हाल न खाणे* अतिशय वाईट स्थिती येणे
*कंठस्नान घालणे* ठार मारणे
*कंठशोष करणे* ओरडून गळा सुकवणे उगाच घसाफोड करून खूप समजावून सांगणे े
*कंबर कसणे* एखाद्या गोष्टीसाठी हिम्मत करून तयार होणे
*कुंपणानेच शेत खाणे* ज्यांच्यावर जबाबदारी आहे अशा विश्वासातील माणसाने फसवणे
*केसाने गळा कापणे* वरकरणी प्रेम दाखवून कपटानं एखाद्याचा घात करणे
*कोंबडे झुंजवणे* दुसऱ्यांचे भांडण लावून आपण मजा पाहणे
*कोपरापासून हात जोडणे* काही संबंध न राहण्याची इच्छा प्रकट करणे
*खडा टाकून पहाणे* अंदाज घेणे
*खसखस पिकणे* मोठ्याने हसणे
*खूणगाठ बांधणे* निश्चय करणे
*खडे चारणे* शरण येण्यास भाग पाडणे
*खडे फोडणे* दोष देणे
*खापर फोडणे* एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे
*खाजवुन खरुज काढणे* मुद्दाम भांडण करू उकरून काढणे
*खाल्ल्याघरचे वासे मोजणे* उपकार करणार याचे वाईट चिंतेने
*खो घालणे* विघ्न निर्माण करणे
*गर्भगळीत होणे* अतिशय घाबरणे
*गळ्यातील ताईत* अतिशय प्रिय
*गळ घालणे* अतिशय आग्रह करणे
*गळ्यात पडणे* एखाद्याला खूपच भीड घालने
*गळ्याशी येणे* नुकसानीबाबत अतिरेक होणे
*गाडी पुन्हा रुळावर येणे* चुकीच्या मार्गावरून पुन्हा पूर्ववत मार्ग योग्य मार्गाला येणे
*गुजराण करणे* निर्वाह करणे
*गुण दाखवणे* निर्गुण दाखवून दुर्गुण दाखवणे
*गंगेत घोडे न्हाणे* कार्य तडीस गेल्यावर समाधान वाटणे
*गळ्यात धोंड पडणे* जबाबदारी अंगावर पडणे
*गाशा गुंडाळणे* एकाएकी निघून जाणे एकदम पसार होणे
*घटका भरणे* विनाश काळ जवळ येऊन ठेपणे
*घर डोक्यावर घेणे* अतिशय गोंगाट करणे
*घर धुवून नेणे* सर्वस्वी लुबाडणे
*घाम गाळणे* खूप कष्ट करणे
*घालून-पाडून बोलणे* दुसऱ्याच्या मनाला लागेल असे बोलणे
*घोडे मारणे* जाणून बुजून  नुकसान करणे
*घोडे पुढे दामटणे* स्वतःच्या फायद्यासाठी पुढे सरसावणेे
*घोडे पेंड खाणे* अडचण निर्माण होणे े
*चतुर्भुज होणे* लग्न करणे
*चार पैसे गाठीला बांधणे* थोडीफार बचत करणे
*चुरमुरे  खात बसणे* खजील होणे
*चारी दिशा मोकळ्या होणे* पूर्ण स्वातंत्र्य मिळणे
*अग्निदिव्य करणे* कठीण कसोटीला उतरणेे
*अंग धरणे* लठ्ठ होणे
*अटकेपार झेंडा लावणे* फार मोठा पराक्रम गाजवला
*अंग काढून घेणे* संबंध तोडणे ,संबंध कमी करणे 
*अठराविश्वे दारिद्र्य असणे* पराकोटीचे दारिद्र्य असणे
*अर्धचंद्र देणे* हकालपट्टी करणे
*अडकित्त्यात सापडणे* पेचात सापडणे
*अंगाची लाही होणे* खूप राग येणे
*अत्तराचे दिवे लावणे* भरपूर उधळपट्टी करणे
*आकाशाची कु-हाड* आकस्मिक संकट
*अन्नास जागणे* उपकाराची आठवण ठेवणे
*अन्नास मोताद होणे* आत्यंतिक दारिद्र्यात जगणे
*अन्नास लावणे( उपजीविकेचे साधन मिळवून देणे
*अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे* थोड्याशा यशाने चढून जाणे
*आकांडतांडव करणे* रागाने आदळआपट करणे
*आकाश ठेंगणे होणे* अतिशय आनंद होणे
*आकाश पाताळ एक करणे* फार मोठ्याने आरडाओरड करून थैमान घालने
*आकाश फाटणे* चारी बाजूंनी संकटे येणे
*आकाशाला गवसणी घालणे* आवाक्याबाहेरची गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे
*आगीत तेल ओतणे* भांडण किंवा वाद विकोपाला जाईल असे करणे
*आच लागणे* झळ लागणे
*आपल्या पोळीवर तूप ओढणे* स्वतःचा फायदा करून घेणे
*आभाळ कोसळणे* एकाएकी फार मोठे संकट येणे
*उखळ पांढरे होणे* पुष्कळ फायदा होणे
*इतिश्री करणे* शेवट करणे
*उखाळ्या-पाखाळ्या काढणे* एकमेकांची उणीदुणी काढणे किंवा दोष देणे
*उचलबांगडी करणे* एखाद्याला जबरदस्तीने हलवणे
*उंटावरून शेळ्या हाकणे* मनापासून काम न करणे दूरवरून निर्देश देणे स्वतः सामील न होता सल्ले देणे
*उदक सोडणे* एखाद्या वस्तूवरील आपला हक्क सोडून देणे
*उध्वस्त होणे* नाश पावणे
*उंबराचे फूल * क्वचित भेटणारी व्यक्ती
*उन्मळून पडणे* मुळासकट कोसळणे
*उन्हाची लाही फुटणे* अतिशय कडक ऊन पडणे
*उराशी बाळगणे* मनात जतन करुन ठेवणे
*उलटी अंबारी हाती येणे* भीक मागण्याची पाळी येणे
*निवास करणे* रहाणे
*दुमदुमून जाणे* निनादून जाणे
*सांगड  घालणे* मेळ साधने
*प्रेरणा मिळणे* स्फूर्ती मिळणे
*नाव मिळवणे* कीर्ती मिळवणे
*हात न पसरणे* मदत न मागणे
*आड येणे* अडथळा निर्माण करणे
*धन्य होणे* कृतार्थ होणे
*उदास होणे* खिन्न होणे
*विहरणे* संचार करणे
*बावरणे* गोंधळणे
*वाट तुडवणे* रस्ता कापणे
*पाहुणचार करणे* आदरातिथ्य करणे
*अनमान करणे* संकोच करणे
*ताट वाढणे* जेवायला वाढणे
*तोंडी लावणे* जेवताना चाखण्यासाठी एखादा पदार्थ देणे
*छोटेशाही चालवणे* दांडगाई करणे
*लांछनास्पद असणे* लाजिरवाणी असणे
*सुळकांडी मारणे* सूर मारणे
*मागमूस नसणे* थांगपत्ता नसणे
*अजरामर होणे* कायमस्वरूपी टिकणे
*कंपित होणे* कापणे थरथरणे
*बेत आखणे* योजना आखणे
*यक्षप्रश्न असणे* महत्त्वाची गोष्ट असणे
*प्रस्ताव ठेवणे* ठराव मांडणे
*विरोध दर्शवणे* प्रतिकार करणे
*प्राप्त करणे* मिळवणे
*गुमान काम करणे* निमूटपणे काम करणे
*सरंजाम असणे* सर्व साहित्य उपलब्ध असणे *हाडामांसात भिनणे* अंगात मुरणे
*स्तंभित होणे* आश्चर्याने स्तब्ध होणे
*मान्यता पावणे* सिद्ध होणे
*तोंडून अक्षरं न फुटणे* घाबरून न बोलणे
*कहर करणे* अतिरेक करणे
*कोडकौतुक होणे* लाड होणे
*अपूर्व योग येणे * दुर्मिळ योग येणे
*रुची निर्माण होणे* गोडी निर्माण होणे
*आंबून जाणे* भेटून जाणे थकणे विपर्यास होणे
*डोळ्याला डोळा न भिडवणे* घाबरून नजर न देणे
*कापरे भरणे* घाबरल्यामुळे थरथरणे
*हसता हसता पोट दुखणे* खूप हसणे
*बस्ती घेणे* धक्का घेणे घाबरणे
*घोकंपट्टी करणे* अर्थ लक्षात न घेता केवळ पाठांतर करणे
*प्रचारात आणणे* जाहीरपणे माहिती देणे
*ठसा उमटवणे* छाप पाडणे
*चक्कर मारणे* फेरफटका मारणे
*दप्तरी दाखल होणे* संग्रही जमा होणे
*अमलात आणणे* कारवाई करणे
*प्रघात पडणे* रीत असणे
*बाहू स्फुरण पावणे* स्फूर्ती येणे
*भान ठेवणे* जाणीव ठेवणे
*नजर वाकडी करणे* वाईट हेतू बाळगणे
*गट्टी जमणे * दोस्ती होणे
*पहारा देणे* राखण करणे
*लवलेश नसणे* जराही पत्ता नसणे जराही न होणे
*उपोषण करणे* *लंघन करणे* उपाशी राहणे
*ताटकळत उभे राहणे* वाट पाहणे
*खंड न पडणे* एखादे कार्य करताना मध्ये न थांबणे
*समजूत काढणे* समजावणे हेवा वाटणे
*मत्सर वाटणे* काळजी घेणे
*चिंता वाहणे* आस्था असणे
*बडेजाव वाढवणे* प्रौढी मिरवणे
*वंचित रहाणे* एखादी गोष्ट न मिळणे
*भरभराट होणे* प्रगती होणे समृद्धी होणे
*बांधणी करणे* रचना करणे
*कटाक्ष असणे * कल असणे
*भर असणे* जोर असणे
पुढाकार घेणे* नेतृत्व करणे
*हातभार लावणे* सहकार्य करणे
*कणव असणे* आस्था किंवा करून असणे
*गढून जाणे* मग्न हो णे गुंग होणे
.........................................................

Popular posts from this blog

......॥जय शिवराय ॥.......

माहिती तंत्रज्ञान अभ्यासक्रम इयत्ता ७ वी